Aishwarya Rai : आयफा  (IIFA 2022)  पुरस्कार सोहळा हा अबुधाबी येथे नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींनी त्यांच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले. पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननेदेखील (Aishwarya Rai Bachchan) हजेरी लावली होती. ऐश्वर्याचा रेड कार्पेट लूक काही चाहत्यांच्या पसंतीस उतरला. तर काही नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले. 


आयफा पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्याने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर गडद रंगाची लिप्स्टिक आणि आयलायनर लावले होते. ऐश्वर्याचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस न उतरल्याने त्यांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल करायला सुरुवात केली. हे इफ्तार 2022 नसून आयफा 2022 आहे, भीतिदायक लूक अशा अनेक कमेंट्स नेटकरी करत आहेत. 






कान्स लूकमुळेदेखील ऐश्वर्या ट्रोल


ऐश्वर्या तिच्या लूकमुळे अनेकदा ट्रोल होत असते. नुकत्याच पार पडलेल्या 'कान्स चित्रपट महोत्सवात'देखील ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा जलवा पाहायला मिळाला होता. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या रायने एन्ट्री केली आणि आपल्या रेड कार्पेट लूकने सर्वांची मने जिंकली. रेड कार्पेट व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चनचे आणखी दोन लूक समोर आले होते, ज्यामुळे तिला प्रचंड ट्रोलही केले गेले होते. कान्स 2022च्या एका कार्यक्रमात ऐश्वर्या भडक रंगाच्या पोशाखात दिसली होती.


यादरम्यान ऐश्वर्या रायने गुबाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता. तिच्या लूकने तिने चाहत्यांना घायाळ केले होते. ऐश्वर्या राय-बच्चन दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावत असते आणि तिच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेते. 


संबंधित बातम्या


Cannes Film Festival 2022 : ती गुलाबी परी जणू... ‘कान्स चित्रपट महोत्सवात’ ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा जलवा!


Aishwarya Rai Bachchan : ‘कान्स’ सोहळ्यासाठी ऐश्वर्या राय सहकुटुंब रवाना! एअरपोर्टवर दिसला खास ‘फॅमिली’ अंदाज!