मुंबई : विश्व सुंदरी आणि बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या रायनं आता मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांच्या 'हृदयांतर' या सिनेमाच्या म्युजिक लॉन्चवेळी ऐश्वर्या बोलत होती.

मराठी सिनेमात काम करण्याबद्दल ऐश्वर्या म्हणाली की, ''मला मराठी चित्रपटात काम करायला मिळाला तर आनंदच आहे, जर मला स्क्रिप्ट आवडली, तर मी नक्कीच मराठी चित्रपटात काम करेन.''

'हृदयांतर' या सिनेमाला सुरुवातीपासूनच बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांकडून सहकार्य मिळालं असून, या सिनेमाच्या शूटिंगच्या मुहूर्ताचा नारळ शाहरुख खानच्या हस्ते फोडण्यात आला होता. तर या सिनेमाचं ट्रेलर हृतिक रोशनकडून लॉन्च करण्यात आलं होतं.

सुबोध आणि मुक्ता बर्वेचा हा सिनेमा 7 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, या सिनेमात तृष्णिका शिंदे आणि निष्ठा वैद्यने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.