मुंबई : शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेला ‘देवदास’ सिनेमा पुन्हा रिलीज केला जाणार आहे. डीएनए वृत्तपत्राच्या माहितीनुसार, दिग्दर्शक संजय लीला भन्सालीने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, यावेळी ‘देवदास’ थ्रीडीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आणला जाणार आहे.


थ्रीडीमधील ‘देवदास’च्या निमित्तान शाहरुख खान आणि संजय लीला भन्साली यांची यशस्वी जोडी पुन्हा बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालू शकते. शाहरुखचा जबरदस्त अभिनय आणि संजय लीला भन्सालीचं उत्कृष्ट दिग्दर्शन पुन्हा एकत्रित आल्यास नक्कीच सिनेसृष्टीत माईलस्टोन ठरेल.

सध्या जगभरातील सिनेक्षेत्रात थ्रीडी सिनेमांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे भारतीय सिनेसृष्टीत लोकप्रियतेचा कळस गाठलेला ‘देवदास’ पुन्हा पाहण्यासाठी सिनेरसिक नक्कीच उत्सुक असतील.

दरम्यान, शाहरुख खान सध्या अनुष्का शर्मासोबतच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, संजय लीला भन्साली ‘पद्मावती’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.