Abhishek Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा (Aishwarya Rai Bachchan)  'पोन्नियिन सेलवन 2'  (Ponniyin Selvan 2) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाचं अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.  आता अभिनेता अभिषेक बच्चननं (Abhishek Bachchan) ट्वीट शेअर करुन 'पोन्नियिन सेलवन 2' या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या ट्वीटला रिप्लाय देत एका नेटकऱ्यानं अभिषेकला एक सल्ला दिला आहे. त्या नेटकऱ्याच्या ट्वीटला अभिषेकनं दिलेल्या रिप्लायचं अनेकांनी कौतुक केलं आहे.


अभिषेकचं ट्वीट


अभिषेकनं 'पोन्नियिन सेलवन 2' या चित्रपटाचं कौतुक करत एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं,  'या चित्रपटाचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. चित्रपटाची टीम, कास्ट आणि क्रूचे अभिनंदन. माझी पत्नी ऐश्वर्या राय बच्चनचा मला अभिमान वाट आहे.' 






नेटकऱ्याचा रिप्लाय


अभिषेकच्या या ट्वीटला एका नेटकऱ्यानं रिप्लाय दिला, ''तुला तिचा अभिमान वाटलाच पाहिजे. तिला अजून चित्रपट साईन करुन दे आणि तू  आराध्याची काळजी घे' नेटकऱ्याच्या या ट्वीटला अभिषेकनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.






अभिषेकचा रिप्लाय


नेटकऱ्याच्या ट्वीटला अभिषेकनं रिप्लाय दिला, 'तिला चित्रपट साईन करु दे? सर, तिला एखादी गोष्ट करण्यासाठी माझ्या परवानगीची काहीच गरज नाहीये. विशेषतः जेव्हा तिच्या आवडीचं काम ती करत असेल, तेव्हा तिला ते काम करण्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाहीये.' 




'पोन्नियिन सेल्वन 2' या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला, आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, रहमान, लाल, जयचित्रा आणि नस्सर या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Ponniyin Selvan 2 Box Office Collection: 'पोन्नियिन सेल्वन 2' चा बॉक्स ऑफिसवर जलवा; दुसऱ्या दिवशी केली एवढी कमाई