Aishwarya Rai Bachchan Photo On Passport : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची (Aishwarya Rai Bachchan) गणना जगातील सुंदर अभिनेत्रींच्या यादीत होते. ऐश्वर्या रायची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. सध्या ऐश्वर्याचा पासपोर्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


ऐश्वर्याच्या व्हायरल होणाऱ्या पासपोर्ट फोटोवर अनेक डीटेल्स  आहेत. पासपोर्ट फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हा पासपोर्ट फोटो खूप वर्षांपूर्वीचा आहे. विश्व सुंदरीचा जुना फोटो पाहून चाहते मात्र आनंदी झाले आहेत. पासपोर्टवरील लोकांचा फोटो फारसा चांगला नसतो. पण ऐश्वर्याचा फोटो मात्र खूपच चांगला आहे. त्यामुळे चाहते हैराण झाले आहेत. 






ऐश्वर्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. चांगल्या फोटोचा पासपोर्ट असणारा हा जगातील पहिलाच पासपोर्ट आहे. अशा अनेक मजेशीर कमेंट्स नेटकरी करत आहेत. ऐश्वर्याचा 'पोन्नियिन सेलवन' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Ladki The Dragon Girl : रामगोपाल वर्मांचा 'लडकी : ड्रॅगन गर्ल' चीनमध्ये होणार प्रदर्शित; 15 जुलैला येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Kaali Poster : काली पोस्टर वादावर ट्वीटरने उचललं मोठं पाऊल; लीना मणिमेकलाईची वादग्रस्त पोस्ट हटवली