Aaradhya Bachchan:  अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan ) यांची मुलगी आराध्या बच्चनचा (Aaradhya Bachchan)  16 नोव्हेंबरला वाढदिवस होता. आराध्याच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक आणि ऐश्वर्यानं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


लेकीच्या बर्थ-डेला ऐश्वर्याची खास पोस्ट


आराध्याच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्यानं खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'मी तुझ्यावर अमर्यादपणे, बिनशर्त, सदैव  प्रेम करते.  मी तुझ्यासाठी जगते . तू माझा आत्मा आहेस. तुला12 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुला सदैव आशीर्वाद देईल. अनमोल प्रेम… मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते. तू सर्वोत्तम आहेस."






अभिषेकची पोस्ट


अभिषेकनं आराध्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "माझ्या  राजकुमारीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो.".सोनू सूद, सुनील शेट्टी, नील नितीन मुकेश प्रीती आणि झिंटा यांनी अभिनेषेकनं शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.






 ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी एप्रिल 2007 मध्ये लग्न केले.  2011 मध्ये ऐश्वर्यानं  आराध्याला जन्म दिला. आराध्या ही सोशल मीडियावर चर्चेत असणारी स्टार किड आहे. 


 ऐश्वर्या आणि अभिषेकचे चित्रपट


अभिषेक बच्चनटा घुमर हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटामधील अभिषेकच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली. तसेच  ऐश्वर्या राय बच्चनचा  'पोन्नियिन सेल्वन 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  चियान विक्रम, कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला, आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, रहमान, लाल, जयचित्रा आणि नस्सर या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली. आता ऐश्वर्या आणि अभिषेकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Abhishek Bachchan : 'ऐश्वर्याला चित्रपट साईन करू दे आणि तू आराध्याची काळजी घे', नेटकऱ्याचा सल्ला; अभिषेकच्या रिप्लायचं होतंय कौतुक,म्हणाला...