Aishwarya Rai Abhishek Bachchan : विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक हे बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. दोघांचाही मोठा चाहतावर्ग असून त्यांना एकत्र पाहताना चाहत्यांना वेगळाच आनंद मिळत असतो. ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा (Aishwarya Rai-Abhishek Bachchan Divorce) काही दिवसांपासून सुरू आहेत. पण या सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ऐश्वर्या-अभिषेकमुळे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चनदेखील (Jaya Bachchan) चर्चेत आले होते. 


ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला आता 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. 20 एप्रिल 2007 मध्ये ऐश्वर्या-अभिषेक लग्नबंधनात अडकले होते. आता लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या-अभिषेक दोघांनीही सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघांव्यतिरिक्त त्यांची लाडकी लेक आराध्या बच्चनदेखील (Aaradhya Bachchan) दिसून येत आहे. फोटोत अभिषेक-ऐश्वर्यासह आराध्या बच्चनदेखील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आराध्याचा तिच्या आई-वडिलांसोबतचा फोटो खूपच खास आहे. दोघांच्याही फोटोंवर चाहते शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 


ऐश्वर्या-अभिषेकची 'ती' पोस्ट व्हायरल (Aishwarya Rai Abhishek Bachchan Post)


ऐश्वर्या-अभिषेकची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. फोटो शेअर करत ऐश्वर्या-अभिषेकने कॅप्शनमध्ये रेड हार्ट इमोजी टाकला आहे. फोटोखाली असणारं रेड हार्ट इमोजीचं कॅप्शन बरंच काही सांगून जाणारं आहे. ऐश्वर्या अनेकदा कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येते. बॉलिवूड स्टार्सपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनी या जोडप्याच्या पोस्टवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर अनेक नेटकरी आराध्याच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.






मैत्री, प्रेम ते लग्न...


ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ते लग्नबंधनात अडकले. न्यूयॉर्क येथील हॉटेलच्या बाल्कनीत अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं, असं म्हटलं जात होतं. आता ऐश्वर्या-अभिषेकच्या एका पोस्टमुळे त्यांच्यात सारं काही आलबेल असल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात घटस्फोट होऊ नये, असं चाहते म्हणत आहेत. अभिषेक-ऐश्वर्या 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. अभिषेकसोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्याने एका झाडाला सात फेरे घेतल्याचं म्हटलं जात आहे.


संबंधित बातम्या


Bachchan Family Net Worth : गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती