Sooryavanshi First Song Released: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. त्याच्या हटके स्टाइलमुळे आणि स्टंटमुळे त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकतच त्याच्या सूर्यवंशी या चित्रपटातील गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्याचं नाव 'आयला रे आयला' असे आहे. अक्षयच्या 'खट्टा मिटा' या चित्रपटातील गाण्याचे रिक्रिएशन करून हे गाणं तयार करण्यात आले आहे. अक्षयसोबतच या गाण्यामध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि अजय देवगण देखील भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. 

Continues below advertisement

बॉलिवूडमधील दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटांची प्रेक्षक नेहमी उत्सुकेने वाट पाहात असतात. त्याच्या सिंघम आणि सिंम्बा या पोलीसांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता सूर्यवंशी या चित्रपटाच्या 'आयला रे आयला' या गाण्यामुळे या चित्रपटाची लोक उत्सुकेने वाट पाहात आहेत.  हे गाणे प्रसिद्ध गायक दिलेर मेहंदी यांनी गायले असून गाण्याला संगित तनिष्क बागची यांनी दिले आहे. या गाण्यामध्ये अक्षय, रणवीर आणि अजयला एकत्र पाहून त्यांचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. रणवीरच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘मल्हारी’ या गाण्याच्या स्टेप्स देखील तुम्हाला 'आयला रे आयला' या गाण्यामध्ये दिसतील.  

Prabhas Birthday Celebration : साउथचा स्टार Prabhas चा वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सिनेमागृहात पुन्हा एकदा पाहता येणार 'मिर्ची' सिनेमा

Continues below advertisement

सूर्यवंशी हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हे गाणे चाहत्यांसोबत शेअर करून अक्षयने त्याला कॅप्शन दिले, 'जेव्हा सुर्यवंशी, सिंम्बा आणि सिंघम एकत्र येतात तेव्हा उत्सव साजरा केला जातो.' या गाण्याला केवळ 13 मिनिटांमध्ये  1 लाखापेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिले आहे. सूर्यवंशी या चित्रपटामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ आणि अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात रंगतोय 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' कॅप्टनसी टास्क, स्पर्धक आखत आहेत रणनीती