मुंबई : अभिनेता हृतिक रोशनसंदर्भात केलेल्या गौप्यस्फोटामुळे अभिनेत्री कंगना राणावतची जोरदार चर्चा आहे. आता या लढाईत कंगनाची बहिण रंगोलीनेही उडी मारली आहे. रंगोलीने आपल्या बहिणीचा बचाव करताना ट्विटरवर कमाल राशिद खान उर्फ केआरकेला इंगा दाखवला. रंगोली एवढ्यावरच थांबली नाही तर तिने केआरकेला शिव्याही दिल्या.

आदित्य पांचोलीच्या पत्नीने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, "कंगना-आदित्य साडेचार वर्ष रिलेशनशिपमध्ये होते." यावर प्रतिक्रिया देताना रंगोली म्हणाली की, "जर कंगना आदित्यला 2005 मध्ये भेटली होती आणि 2007 मध्ये तिच्या विरोधात केस दाखल केली तर ही फक्त साडेसाच वर्ष कशी झाली?"

या वादात रंगोलीच्या या प्रश्नावर उत्तर देताना केआरकेने लिहिलं आहे की, "कंगना 2005 मध्ये आदित्यला भेटली आणि तिचा सिनेमा एप्रिल 2006 मध्ये प्रदर्शित झाला. कंगना आदित्यला 2003 मध्ये भेटल्याचं सांगण्यासाठी माझ्याकडे 5 साक्षीदार आहेत."

https://twitter.com/kamaalrkhan/status/906842325128826880

या ट्वीटवर संतापलेली रंगोली म्हणाली की, "ला सबूत, मैं तुझे चैलेंज करती हूं, कंगना-आदित्य के 2003 में मिलने का सबूत ला वरना सबके सामने नाक रगड़ बिकाऊ कुत्ते.."

https://twitter.com/Rangoli_A/status/906855750554677248

रंगोली एवढ्यावरच थांबली नाही. तिने पुढे लिहिलं की, "बस हड्डी मिली है और यह कुत्ता भौंक रहा है, ला सबूत..."

https://twitter.com/Rangoli_A/status/906855897372139520

"सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी 'सिमरन' सिनेमा पाहिला. तो अतिशय वाईट आणि दर्जाहिन चित्रपट आहे. जेलमधील कैद्यांना टॉर्चर करण्यासाठी तो वापरता येईल," असं ट्वीट केआरकेने पुढे केलं.

https://twitter.com/kamaalrkhan/status/906852972415426560

यापुढे कंगनाने अनेक ट्वीट केले. "विषय भरकटवू नको. पुरावे आण म्हणालो ना, आण आता. आणत का नाहीस? तू मोठा रिव्ह्यू देणारा"

https://twitter.com/Rangoli_A/status/906861928764514305

"और तू बेकार बुड्ढा, बेरोजगार कहीं का. दुसरों को गलत बातें बोल कर अपना घर चलाता है, तेरी क्या औकात है"

https://twitter.com/Rangoli_A/status/906862365555138571

"अपनी विग देख कितनी आऊटडेटेड हैं और शक्ल जैसे मरा हुआ क्रो..."

https://twitter.com/Rangoli_A/status/906862491849785344

रंगोलीच्या या ट्वीटवर कमाल खान म्हणाला की, "कंगनाच्या पहिल्या फोटोशूटची तारीख बघ. हे फोटोशूट ज्याने अरेंज केलं, तो आदित्य आणि शिल्पा शेट्टीचा मॅनेजर भूप्पी हा साक्षीदार आहे."

https://twitter.com/kamaalrkhan/status/906863816553713664

"पुरावे दाखव, कोण काय म्हणाला ते नाही. माझं आव्हान आहे, चंदीगडमधील डीएव्ही सेक्टर 15 मध्ये कॉल करा आणि कंगना कोणत्या वर्षात पासाऊट झाली ह्याची माहिती मिळवा."

https://twitter.com/Rangoli_A/status/906867437273878528

"ती तेव्हा हॉस्टेलमध्ये होती. 2003 मध्ये जर ती मुंबईतच आली नाही तर ती आदित्यला कशी भेटेल?"

https://twitter.com/Rangoli_A/status/906869196000079872