सलमान खान लवकरच बाबा होणार?
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2017 04:42 PM (IST)
वडील सलीम आणि आई सलमा खान यांना नातवंडांचं तोंड पाहायचं असल्याचं सलमान खानने सांगितलं होतं.
मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न अनेकांना पडलेला असतानाच, आता तो बाबा होण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. शाहरुख खान, आमीर खान, करण जोहर, तुषार कपूर यांच्यापाठोपाठ आता सलमान खानही सरोगसी पद्धतीने बाबा होण्याची तयारी सुरु केली आहे. करण जोहर आणि तुषार कपूर हे सरोगसीद्वारे सिंगल फादर झाले आहेत. तर शाहरुख आणि आमीर यांनी लग्नानंतर सरोगसीद्वारे पितृत्व स्वीकारलं. जर हे वृत्त खरं ठरलं, तर करण जोहर आणि तुषार कपूरनंतर सलमान खान बॉलिवूडचा सिंगल सरोगेट फादर असेल. वडील सलीम आणि आई सलमा खान यांना नातवंडांचं तोंड पाहायचं असल्याचं सलमान खानने सांगितलं होतं. त्यामुळे येत्या दोन ते तीन वर्षात सरोगेट बाबा बनण्याचा सल्लूचा मानस आहे.