मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेल्या 'ठाकरे' आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या चरित्रावर आधारित 'मणिकर्णिका : दी क्वीन ऑफ झासी' हे दोन चित्रपट शुक्रवारी आपल्या भेटीस आले. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर धुमाकुळ घालत आहेत. या दोन चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगलीच स्पर्धा सुरु आहे.

प्रदर्शनाच्या पहिला दिवशी 'ठाकरे' चित्रपटाने 6 कोटी रुपयांची कमाई केली. तर 'मणिकर्णिका'ने पहिल्या दिवशी 8.75 कोटी रुपयांची कमाई केली. काल प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने दोन्ही चित्रपट कमाईत मोठी झेप घेणार हे निश्चित होतं.

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 'ठाकरे'ने 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या बाजूला 'मणिकर्णिका'ने दुसऱ्या दिवशी कमाईत अपेक्षेपेक्षा मोठी झेप घेत तब्बल 18.10 कोटी रुपये कमावले. दोन दिवसांत 'ठाकरे'ने 16 कोटी तर 'मणिकर्णिका'ने 26.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'ठाकरे' हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर 'मणिकर्णिका' हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. दोन्ही चित्रपटांच्या दोन दिवसांच्या कमाईचा विचार केला तर 'मणिकर्णिका'ने 'ठाकरे'ला मागे टाकले आहे.




संबधित बातम्या

'ठाकरे' सिनेमाची थिएटर कॉपी लीक

REVIEW : राणी लक्ष्मीबाईंसाठी एकदा 'मणिकर्णिका' पाहा

REVIEW : ठाकरे - झंजावातामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न