नवी दिल्लीः या वर्षातील मच अवेटेड सिनेमा 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये एकतर्फी प्रेम, मैत्री आणि तुटलेल्या प्रेमाची कथा दाखवण्यात आली आहे. शिवाय अभिनेत्री ऐश्वर्या रायचा बोल्ड अंदाज अनेक दिवसांनंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


 

या सिनेमात ऐश्वर्यासह रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, फवाद खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. टीझरमध्ये रणबीर गात असलेलं सिनेमातील टायटल साँग दाखवण्यात आलं आहे. एक तासात जवळपास 60 हजार जणांनी हा टीझर पाहिला आहे. यावरुनच प्रेक्षकांची सिनेमाविषयीची उत्सुकता दिसत आहे.

 

ऐश्वर्या आणि रणबीरची जोडी पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टीझरमध्ये रणबीर ऐश्वर्याचे इंटिमेट सिन्सही दाखवण्यात आले आहेत. सिनेमाच्या शुटिंगनंतर बिग बी अमिताभ बच्चन सुनेने दिलेल्या या दृष्यांमुळे नाराज झाले होते, असंही बोललं जातं. हा सिनेमा 28 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

 

पाहा टीझरः