Aditya Narayan Social Media Break : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि अभिनेता आदित्य नारायण (Aditya Narayan) सध्या चर्चेत आहे. आपल्या गाण्याने आदित्यने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आता त्याने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. एक खास पोस्ट शेअर करत त्याने यासंदर्भात घोषणा केली आहे.
आदित्यने तीन महिन्यांसाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याने सर्व पोस्ट, फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत. आदित्यने एक खास पोस्ट शेअर करत सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याने लिहिलं आहे,"माझ्याबद्दल काही अफवा येण्याआधीच मी चाहत्यांना सांगू इच्छितो की मी ठीक असून सध्या मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे. आता मला माझ्या लेकीसोबत, पत्ती आणि आई-वडिलांसोबत जास्तीत जास्त घालवायचा आहे. तसेच 'सांसें' या माझ्या पहिल्या अल्बमवरदेखील काम करत आहे.
'या' कारणाने आदित्यने हटवल्या सर्व पोस्ट
आदित्य नारायणने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्यासोबत सर्व पोस्टदेखील हटवल्या आहेत. याबद्दल बोलताना तो म्हणाला की,"माझं सोशल मीडिया प्रोफाइल एका कॅनव्हास प्रमाणे आहे. त्यामुळेच नवी सुरुवात करण्याआधी आधीच्या सर्व पोस्ट, फोटो मी डिलीट केले आहेत. आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे".
तीन महिन्यांनी करणार कमबॅक
आदित्यने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तो तीन महिन्यांनी कमबॅक करत असल्याचं सांगितलं आहे. त्याने लिहिलं आहे,"नवं काहीतरी शिकण्यासाठी आता मी सज्ज आहे. मला वाटतं सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा रिअलिस्टिक जगात जास्तीत जास्त वेळ घालवा. जुलैमध्ये भेटू".
आदित्य नारायणबद्दल जाणून घ्या...
आदित्य नारायणने 1992 साली 'मोहिनी' या सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं आहे. संगीताचा वारसा लाभलेल्या आदित्यने बालपमीच सुरांचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. तसेच त्याने 2009 साली 'शपित' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्याचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला होता. आदित्य नारायण हा लोकप्रिय गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे.
संबंधित बातम्या