Nana Patekar On Sinhasan : 'सिंहासन' (Sinhasan) हा सिनेमा 1979 साली सिनेमागृहात प्रदर्शित झाला. पण आज 44 वर्षांनंतरही हा सिनेमा प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता या सिनेमाला 44 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने या सिनेमाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी या सिनेमाबाबतचे काही किस्से शेअर केले. 


'सिंहासन'साठी नाना पाटेकर यांना किती मानधन मिळालं? 


'सिंहासन' या सिनेमासाठी नाने पाटेकर यांनी तीन हजार रुपये मानधन मिळालं होतं. याबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले,"सिंहासन' या सिनेमासाठी जब्बार पटेल यांनी मला तीन हजार रुपये दिले होते. त्यावेळी शंभर रुपयांत चार जणांनं रेशन भरलं जात असे". 


नाना पाटेकरांनी शेअर केली 'ती' वाईट आठवण


'सिंहासन'च्या स्क्रीनिंगच्या निमित्ताने नाना पाटेकर यांनी एक दु:खद घटना शेअर केली. 'सिंहासन' या सिनेमात नाना पाटेकर जयराम हर्दीकर यांना मारतो असं दाखवण्यात आलं आहे. याबद्दलची वाईट आठवण शेअर करत नाना पाटेकर म्हणाले,"या सिनेमात मी जयराम हर्दीकरांना मारतो असं दाखवलं आहे. पण या सिनेमानंतर लगेचच त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचं निधन झालं. त्यानंतर हर्दीकरांच्या पत्नी कित्येक वर्ष माझ्यासोबत बोलत नव्हत्या. पण या सिनेमाची सकारात्मक बाजू अशी की, या सिनेमानंतर मला अनेक चांगल्या सिनेमांत काम करण्याची संधी मिळाली". 


'सिंहासन'बद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले,"सिंहासन'च्या निमित्ताने स्वत:ला रुपेरी पडद्यावर पाहणं याचचं अप्रुप होतं. त्यावेळी सिनेमात काम करणं ही खूप मोठी गोष्ट वाटायची. जब्बारने या सिनेमासाठी तीन हजार रुपये देत 30 महिन्याचं रेशन माझं भरलं आहे. 'सिंहासन'नंतर चांगल्या भूमिकांसाठी मला विचारणा होऊ लागली". 


'सिंहासन' या सिनेमाची तगडी स्टार कास्ट होती. पण या सिनेमात आणखी कोणता कलाकार असायला हवा होता याबद्दल पटेल यांना विचारलं असता त्यांनी एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले,"डॉ. काशिनाथ घाणेकर माझ्यावर खूप रागावले होते. तुझ्या सिनेमात मी का नाही असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता. तेव्हा निम्म शूटिंग बाकी होतं आणि सिनेप्रेमींमध्ये काशिनाथची क्रेझ होती. पण काशिनाथला साजेशी एकही भूमिका सिनेमात नसल्यामुळे मला या सिनेमात त्याला घेता आलं नाही".


संबंधित बातम्या


Sinhasan : एका दिवसात सिनेमाचं एडिटिंग ते शरद पवारांच्या उपस्थितीत प्रिमिअर; जब्बार पटेल यांनी 'सिंहासन'च्या आठवणींना दिला उजाळा