Hrithik Roshan JR NTR War 2 Release Date : बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआर (JR NTR) सध्या 'वॉर 2' (War 2) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. अद्याप निर्मात्यांनी या सिनेमासंदर्भात माहिती दिलेली नाही. पण ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरने मात्र या सिनेमासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. 'वॉर 2' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 


'वॉर 2' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (War 2 Release Date)


ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा आगामी 'वॉर 2' हा बहुचर्चित सिनेमा 25 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनसह नाट्य पाहायला मिळणार आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय सुनिव्हर्समधील हा आगामी सिनेमा आहे. या सिनेमात ज्युनियर एनटीआर आणि ऋतिक रोशन एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत. 






अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' 


'वॉर 2' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अयान मुखर्जीने सांभाळली आहे. या सिनेमानंतर ते 'ब्रह्मास्त्र 2' आणि 'ब्रह्मास्त्र 3'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 


ऋतिक रोशनने ज्युनिअर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त एक खास ट्वीट केलं आहे. त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिलं आहे की,"युद्धभूमी तुझी प्रतीक्षा करत आहे". यावर उत्तर देत एनटीआरने लवकरच शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं आहे. 


ऋतिक आणि ज्युनिअरच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या...


ऋतिक रोशन सध्या त्याच्या 'फायटर' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो 'वॉर 2'च्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान ज्युनिअर एनटीआर 'एनटीआर 30' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. आता ऋतिक आणि ज्युनिअरच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 


सलमानच्या 'Tiger 3' नंतर प्रदर्शित होणार 'वॉर 2'


यशराज फिल्मच्या बॅनरअंतर्गत निर्मिती होत असलेला सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमानंतर 'वॉर 2' (War 2) हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर 'वॉर 2' चांगलाच गल्ला जमवणार असे म्हटले जात आहे. 


संबंधित बातम्या


Hrithik Roshan : 'War 2'मध्ये 'आरआरआर' फेम ज्युनियर एनटीआरची एन्ट्री! हृतिक रोशनसोबत झळकणार रुपेरी पडद्यावर