Adipurush: अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. त्यानंतर या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. आता या चित्रपटाच्या टीमनं या चित्रपटाबद्दल एक निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी, निर्मात्यांनी प्रत्येक थिएटरमध्ये भगवान हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली आहे.
आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित करताना प्रत्येक चित्रपटगृहात भगवान हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवण्याची घोषणा चित्रपटाच्या टीमनं केली आहे. निर्मात्यांनी ही घोषणा चित्रपटाच्या रिलीजच्या अवघ्या 10 दिवस आधी केली.
आदिपुरुषनं रिलीज आधीच केली कोट्यवधींची कमाई
500 कोटींच्या बजेटमध्ये आदिपुरुष चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार, 'आदिपुरुष' या चित्नेरपटाने रिलीजआधीच 432 कोटींचा गल्ला जमवला आहे. थिएट्रिकल राइट्स, सॅटेलाइट राइट्स, म्यूझिक राइट्स, डिजिटल राइट्स अशा अनेक गोष्टींमधून या चित्रपटाने रिलीजआधीच चांगलीच कमाई केली आहे.
'आदिपुरुष' चित्रपटाची स्टार कास्ट
'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी रिलीज होणार आहे. आदिपुरुष या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात सनी सिंह हा लक्ष्मण ही भूमिका साकारत आहे. 'आदिपुरुष' या चित्रपटात मराठमोळा देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे.
काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या चित्रपटातील जय श्री राम हे गाणं रिलीज झालं. जय श्री राम या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच या चित्रपटातील राम सिया राम हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. जय श्री राम आणि राम सिया राम या आदिपुरुष चित्रपटामधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
प्रभासचा 'आदिपुरुष' आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकेतेने वाट बघत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: