Adipurush Ram Siya Ram Song : 'आदिपुरुष' (Adipurush) या बहुचर्चित सिनेमातील 'राम सिया राम' (Ram Siya Ram) हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. रिलीज होताच हे गाणं युट्यूबवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या गाण्याचे बोल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या गाण्याला एका तासात 1.2 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.
'राम सिया राम' सोशल मीडियावर व्हायरल
'आदिपुरुष' सिनेमातील 'राम सिया राम' हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्याच्या बोलपासून संगीतापर्यंत सर्व गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या भक्तिमय गीताचे बोल लोकप्रिय गीतकार मनोज मुंतसिर शुक्ला यांनी लिहिले आहेत. तर सचेत टंडन आणि परंपरा टंडनने हे गाणं गायलं आहे.
'राम सिया राम' या गाण्यात राम आणि सीता यांच्यातील प्रेम दाखवण्यात आलं आहे. टी-सीरिज या युट्यूब चॅनलवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. प्रभासने हे गाणं शेअर करत लिहिलं आहे,"आदिपुरुष'चा आत्मा".
'आदिपुरुष' कधी होणार रिलीज? (Adipurush Released Date)
'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 700 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पण तरीही सिनेप्रेमींमध्ये या सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सिनेमात प्रभास, कृती सेनन, सनी सिंह, देवदत्त नागे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'राम सिया राम' या गाण्याआधी या सिनेमातील 'जय श्री राम' (Jai Shri Ram) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचं संगीत दिग्दर्शन लोकप्रिय संगीतकार अजय-अतुल यांनी केलं आहे. तर मुंतशिर शुक्ला या गाण्याचे गीतकार आहेत. 'राम सिया राम' आणि 'जय श्री राम' ही दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
संबंधित बातम्या