Adipurush: आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आज अक्षय्य तृतीयेला दिग्दर्शक ओम राऊतच्या (Om Raut) आदिपुरुष या चित्रपटाचं एक मोशन पोस्टर नुकतच रिलीज करण्यात आलं आहे.  जय श्रीराम या गाण्याचं हे लिरिकल मोशन पोस्टर आहे. 


आदिपुरुष या चित्रपटाचं जय श्रीराम हे लिरिकल मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हिंदीसोबतच तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये देखील हे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. प्रभासनं हे  लिरिकल मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. हे पोस्टर शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जब न जा पाओ सारे धाम, तो बस ले लो प्रभु का नाम,जय श्रीराम' प्रभासनं शेअर केलेल्या या मोशन पोस्टरमध्ये प्रभासच्या हातात धनुष्यबाण दिसत आहे. प्रभासच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


पाहा पोस्टर






'आदिपुरुष' ची स्टार कास्ट


आदिपुरुष या चित्रपटात  प्रभास हा रामची भूमिका साकारणार आहे. तसेच  कृती सेनन ही सीतेची भूमिका साकारण असून लक्ष्मण या भूमिकेत सनी सिंह असणार आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आणि हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे दिसरणार आहे.


आदिपुरुष कधी होणार रिलीज? 


प्रभासचा 'आदिपुरुष' आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.  आदिपुरुष हा चित्रपट आता 16 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


ट्रायबेका फेस्टिव्हलमध्ये आदिपुरुष या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमिअर होणार आहे. हा प्रिमिअर 13 जून 2023 रोजी होणार आहे.






'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.  या चित्रपटातील सैफ अली खानच्या लूकला देखील अनेकांनी ट्रोल केलं होतं.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Adipurush Poster Release: 'संस्कृतीची चेष्टा...'; आदिपुरुष चित्रपटाच्या पोस्टरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल