Adipurush Box Office Collection Day 8 : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमावर मोठ्या प्रमाणात टिका होत असूनही या सिनेमाने सिनेमागृहात एक आठवडा पूर्ण केला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात हा सिनेमा कमी पडला आहे.
रिलीजच्या आठव्या दिवशी 'आदिपुरुष'ने केली सर्वाधिक कमी कमाई (Adipurush Box Office Collection)
'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी 86 कोटींची कमाई केली होती. पण नंतर सिनेमाच्या कमाईत घट व्हायला लागली. दुसऱ्या दिवशी 65.25 कोटी, तिसरा दिवस 29.03 कोटी, चौथा दिवस 16 कोटी, पाचवा दिवस 10.7 कोटी, सहावा दिवस 7.25 कोटी आणि सातव्या दिवशी 5.50 कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या आठव्या दिवशी या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे. आठव्या दिवशी या सिनेमाने फक्त 3.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 263.40 कोटींचा गल्ला जमवला आहे.
- पहिला दिवस : 86 कोटी
- दुसरा दिवस : 65.25 कोटी
- तिसरा दिवस : 29.03 कोटी
- चौथा दिवस : 16 कोटी
- पाचवा दिवस : 10.7 कोटी
- सहावा दिवस : 7.25 कोटी
- सातवा दिवस : 5.50 कोटी
- आठवा दिवस : 3.50 कोटी
- एकूण कमाई : 263.40 कोटी
'आदिपुरुष' सिनेमावर प्रेक्षक नाराज
'आदिपुरुष' या सिनेमाची 500 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. निर्मात्यांनीदेखील हा सिनेमा 800-900 कोटींची कमाई करेल, असा अंदाज वर्तवला होता. पण रिलीजनंतर या सिनेमावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे.
प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत निर्मात्यांचा मोठा निर्णय
'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा 16 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील संवाद आणि काही वादग्रस्त दृश्यांमुळे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पण प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत या सिनेमातील वादग्रस्त संवाद काढून टाकण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने (Om Raut) सांभाळली आहे. या सिनेमात प्रभास (Prabhas), कृती सेनन (Kriti Sanon), सैफ अली खान (Saif Ali Khan) मुख्य भूमिकेत आहेत. भारतीय सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात हा सिनेमा कमी पडला आहे.
संबंधित बातम्या