Oscar Academy Awards : जगातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत असा ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscar Academy Awards) आणि वाद हे एक समीकरणच झालं आहे. त्यामुळे आता आगामी पुरस्कार सोहळ्यासाठी अकादमीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने काही नियम केले आहेत. या नियमांनुसार आता केवळ एक आठवडा प्रदर्शित झालेला सिनेमा ऑस्करसाठी पात्र ठरणार नाही. 'ऑस्कर'साठी पात्र होण्यासाठी सिनेमांना बॉक्स ऑफिसवर जास्त दिवस कमाई करावी लागणार आहे. ऑस्करसाठी नामांकित होण्यासाठी आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकण्यासाठी स्पर्धकांना आता नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.


अकादमी पुरस्कार सोहळ्याचे नवीन नियम जाणून घ्या... (Oscar Academy Awards New Rules)


- 2024 च्या सुरुवातीला रिलीजच्या 45 दिवसांच्या आत टॉप 50 अमेरिकेतील शहरांमधील 10 शहरांमध्ये सलग सात या सिनेमांचे प्रदर्शन ठेवावे.


-  वितरकांनी 10 जानेवारी 2025 च्या आधी वर्षाअखेरीस अकादमीकडे पडताळणीसाठी संबंधित कागदपत्रे देणे आवश्यक आहे. 


- सिनेमांचे नियोजित शो सिनेमागृहात 24 जानेवारी 2025 पूर्वी लागावेत. 


- यूएस प्रदेशाबाहेर प्रदर्शित झालेले सिनेमे 10 पैकी दोन बाजारांमध्ये दाखवले जाणे आवश्यक आहे.


- यूएस मार्केट व्यतिरिक्त 15 आंतरराष्ट्रीय थिएटर मार्केट आणि देशांतर्गत प्रदेशांसाठी चित्रपट पात्र असणे आवश्यक आहे.


कोरोनाकाळात ऑस्करने थिएटर रिलीज पात्रतेसंबंधित नियम निलंबित केले होते. या नवीन नियमांचा 2023 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या कोणत्याही सिनेमावर परिणाम होणार नाही. हा नियम फक्त सर्वोत्कृष्ट चित्रपट या कॅटेगरीतील नामांकनासाठीचा आहे. 






लॉस एंजलिसमध्ये घुमणारे अॅंड ऑस्कर गोज टू.. हे शब्द कानात साठवण्यासाठी अस्सल हॉलिवूडप्रेमी आसूसलेला असतो. तो दिमाखदार सोहळा देखणा असतोच. पण त्याआधी असणारं रेड कारपेटही पाहण्यासारखं असतं. त्या रेड कारपेटवर जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सिनेरसिकांना वेड लावणारे कलाकार अवतरतात. त्यांची फॅशन आणि त्यांची एक छबी टिपण्यासाठी कॅमेरे सरसावतात आणि त्यानंतर सुरू होतो ऑस्कर्सचा सोहळा. आता आगामी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 






संबंधित बातम्या


The Elephant Whisperers : ऑस्कर विजेता 'द एलिफंट विस्परर्स'मधील 'रघु' रातोरात झाला स्टार; जगभरातून भेटायला येतायत लोक!