Adipurush Trailer: अभिनेता प्रभासच्या  (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या  चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. आदिपुरुष या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमधील डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Continues below advertisement


आदिपुरुष या चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रभासच्या  'रावण आ रहा हूं न्याय के दो पैरों से अन्याय के दस सिर कुचलने, आ रहा हूं अपनी जानकी को ले जाने' या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच अनेक जण या ट्रेलरमधील सैफ अली खानच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. ट्रेलरमध्ये जय श्रीराम हे गाणं देखील ऐकू येत आहे. 


'आदिपुरुष' या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. हा चित्रपट 16 जून रोजी  रिलीज होणार आहे. आदिपुरुष या चित्रपटात  प्रभास हा रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीता ही भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात सनी सिंह हा लक्ष्मण ही भूमिका साकारत आहे.   'आदिपुरुष'  या चित्रपटात मराठमोळा  देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. 


पाहा ट्रेलर:



नुकतेच प्रभासनं सोशल मीडियावर आदिपुरुष या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरला त्यानं कॅप्शन दिलं, 'हर भारतीय की आदिपुरुष'






आदिपुरुष चित्रपटातील गाण्यांना मिळाली प्रेक्षकांची पसंती


काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या चित्रपटातील जय श्री राम हे गाणं रिलीज झालं. जय श्री राम या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच या चित्रपटातील  राम सिया राम हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. जय श्री राम आणि राम सिया राम या आदिपुरुष चित्रपटामधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


प्रभासचा 'आदिपुरुष' आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Adipurush: आदिपुरुष चित्रपटाच्या टीमचा मोठा निर्णय; प्रत्येक थिएटरमध्ये हनुमानासाठी एक जागा असणार राखीव