मुंबई : उर्वशी रौटेला ही बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिला अर्ध्या कोटीहून अधिक लोक फॉलो करतात. तिच्या एका फोटोला तसेच तिने शेअर केलेल्या रिलला लाखो लोक लाईक करतात. याच अभिनेत्रीचा काही दिवसांपूर्वी बाथरुममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. नंतर सिनेमाच्या प्रसिद्धीचा तो एक भाग असल्याचे समोर आले होते. असे असतानचा आता उर्वशी रौटेलाने याच लिक झालेल्या व्हिडीओबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 


तीन दिवसांत 100 कोटींपेक्षा अधिक कमवले


उर्वशी रौटेलाचा डाकू महाराज हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. लोक हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गर्दी करत आहेत. या चित्रपटात तिने केलेल्या नृत्यावर तर अनेकजण फिदा झाले आहेत. तिच्या या गाण्यावर सोशल मीडियावर अनेक रिल्स येत आहेत. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. 


व्हायरल झालेल्या एका व्हिडीओबाबतही दिलं स्पष्टीकरण


याच चित्रपटाच्या यशाबाबत बोलण्यासाठी उर्वशी रौतेलाने एका माध्यमाला मुलाखत दिली आहे. याच मुलाखीतत तिने वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलंय. उर्वशी रौटेलाने तिच्या चाहत्यांनी आभार मानले आहेत. यासह तिने काही दिवसांपूर्वी तिच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे. हा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओत उर्वशी रौटेला बाथरुममध्ये कपडे बदलताना दिसत होती. याच व्हायरल व्हिडीओबाबत तिने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. 






उर्वशी रौटेलाने नेमके काय सांगितले? 


उर्वशी रौटेलाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर तेव्हा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर चित्रपटाच्या प्रसिद्धीचा हा एक भाग होता, असे स्पष्ट करण्यात आले होते. याबाबत आता उर्वशीने अतिरिक्त माहिती दिली आहे. "चित्रपटाचे निर्माते आमच्याकडे रडत-रडत आले होते. चित्रपटाच्या निर्मात्यांवर खूप सारं कर्ज झालं होतं. त्यांना त्यांचे घर वगैरे विकावे लागणार होते. त्यामुळे हा चित्रपट चालावा यासाठी त्यांना काहीतरी वेगळं हवं होतं. या चित्रपटाची सगळीकडे चर्चा व्हावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळेच ते माझ्याकडे आले. त्यांनी माझ्या बिझनेस मॅनेजरशी चर्चा केली. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी त्यांनी माझी परवानगी घेतली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडीओ चित्रपटाचाच एक सिन होता. त्यासाठी आम्ही वेगळं असं काहीही केलं नव्हतं. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा व्हिडीओ लिक करण्यासाठी परवानगी माहितली होती. तो चित्रपटातलाच सिन आहे, तुम्ही चित्रपट पाहिला तर तुम्हाला समजून येईल. सोबतच तो व्हिडीओ व्हायरल करून मुलींमध्ये एक जगारुकताही आम्हाला निर्माण करायची होती. मुलींनी काळजी घेतली पाहिजे, असा संदेश आम्हाला द्यायचा होता," अशी माहिती उर्वशी रौटेलाने दिली.


हेही वाचा :


Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरकडून प्रेमाची कबुली? बॉयफ्रेंडसोबत ट्युनिंग, मॅचिंग नाईट सूटमधील फोटो शेअर करत म्हणाली...


सरकारनं शेतीपिकांचा हमीभाव ठरवावा, अभिनेते मकरंद अनासपुरेंची मागणी, मॉलमध्ये बर्गेनिंग होत नाही पण शेतकऱ्यांकडून घेताना होते