Urvashi Dholakia : उर्वशी ढोलकिया ही अभिनेत्री कामाच्या माध्यमातून आजही लोकांच्या मनावर राज्य करतेय. छोट्या पडद्यावर तिने अनेक मोठ्या मालिकांत काम केलंय. आज देशभरात तिचे लाखो चाहते आहेत. सध्या मात्र उर्वशी ढोलकिया कठीण काळातून जात आहे. कारण सध्या तिला आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली असून त्या आजारावर ती उपचार घेत आहे. याबाबतची माहिती खुद्द उर्वशी ढोलकिया हिनेच आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर दिली आहे.
उर्वशी ढोलकियाला आरोग्यविषयक समस्या
उर्वशी ढोलकियाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामच्या खात्यावर एक स्टोरी ठेवली होती. हा फोटो पाहून उर्वशीच्या चाहत्यांनी तिच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केलीय. तसेच उर्वशी लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे. उर्वशीने 28 फेब्रुवारी रोजी हा फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून पोस्ट केला होता. या फोटोत उर्वशी ढोलकियाच्या हातावर काहीतरी लावण्यात आल्याचं दिसतंय. सोबतच तिने आता नवा लढा चालू झाला आहे. लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे, असं या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.
उर्वशीला नेमकं काय झालंय?
उर्वशीचा हाच फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या हा फोटो चर्चेचा विषय ठरला असून उर्वशीला नेमकं काय झालंय? असं तिचे चाहते विचारत आहेत. हा फोटो पाहून तिला आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली असली तरी तिला नेमकं काय झालंय? याबाबत स्पष्टपणे माहिती समोर आलेली नाही. खुद्द उर्वशीनेही याबाबत काहीही सांगितलेलं नाहीये.
पत्नीपासून राहते वेगळी, दोन मुलांची आई
उर्वशी ढोलकियाचे इन्स्टाग्रावर लाखोंनी चाहते आहेत. तिच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय? याबाबत ती नेहमीच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगत असते. तीला दोन मुलं आहेत. तिच्या पतीपासून ती विभक्त झालेली आहे. पतीपासून वेगळं झाल्यानंतर तिला फारच कठीण काळातून जावं लागलं होतं. आता मात्र ती बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाली आहे.
नुकतीच घेतली 15 लाखांची कार
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून उर्वशी ढोलकिया ही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. कसौटी जिंदगी की या मालिकेत तिने महत्त्वाची भूमिका केली होती. या मालिकेपासूनच तिला मोठी प्रसिद्धी लाभली. गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात उर्वशीने 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची एक आलिशान कार घेतली आहे. ती आपली मुलं आणि आईसोबत राहते.
हेही वाचा :
वय वर्षे 51, पण रुप असं की वाटते 25 वर्षांची तरुणी; मलायका अरोराचे नवे फोटो पाहिलेत का?