तिनं कधीकाळी वेटर म्हणून काम केलं, आज अख्ख्या बॉलिवुडवर करते राज्य; 'ही' सुंदर हसीना नेमकी आहे तरी कोण?
ही अभिनेत्री कधीकाळी आपला खर्च भागावा यासाठी एका कॉफी शॉपमध्ये वेटर म्हणून काम करायची. आज मात्र ती बॉलिवुडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
Continues below advertisement
SHRADDHA KAPOOR
Continues below advertisement
1/7
बॉलिवुडमध्ये नाव कमवणं हे फार कठीण काम आहे. या क्षेत्रात रोज अनेक चेहरे येतात आणि जातात पण काही मोजक्याच लोकांना यात यश येतं. यामध्ये अशाच एका दिग्गज अभिनेत्रीचा समावेश आहे.
2/7
या अभिनेत्रीचे नाव श्रद्धा कपूर असे आहे. विशेष म्हणजे ती शक्ती कपूर यांची मुलगी आहे. एखा दिग्गज अभिनेत्याची मुलगी असली तरी श्रद्धा कपूरला मात्र बॉलिवुडमध्ये संधी काही सहजासहजी मिळालेली नाही.
3/7
श्रद्धा कपूरने कधीकाळी आपला खर्च भागवण्यासाठी थेट कॉफी शॉपमध्ये वेटर म्हणून काम केलेलं आहे. श्रद्धा कपूर बोस्टनमध्ये शिकत होती. त्या काळात खर्च भागावा म्हणून श्रद्धा कपूर वेटर म्हणून काम करायची.
4/7
श्रद्धा कपूरने तीन पत्ती या चित्रपटापासून बॉलिवुडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटात तिला छोटी भूमिका मिळाली होती. आज मात्र ती बॉलिवुडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे.
5/7
श्रद्धा कपूरचे सोशल मीडियावर कोट्यवधी चाहते आहेत. तीन पत्ती या चित्रपटानंतर तिला आशिकी-2 या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका मिळाली.
Continues below advertisement
6/7
या चित्रपटानंतर मात्र श्रद्धा कपूरचं नशीब पालटलं. ती रातोरात स्टार झाली.
7/7
श्रद्धा कपूरने आज अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिने भूमिका केलेला स्त्री, स्त्री-2 हा चित्रपट तर बॉक्स ऑफिसवर भरघोस गल्ला जमवणारा ठरला.
Published at : 01 Mar 2025 04:38 PM (IST)