सनी लिओन पुन्हा आई झाली
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2018 12:27 PM (IST)
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन सनीने आपला आनंद व्यक्त केला आहे. अॅशर सिंग वेबर आणि नोआ सिंग वेबर अशी चिमुरड्यांची नावं आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. सनी लिओन दोन मुलांची आई झाली आहे. त्यामुळे सनी आणि पती डॅनिएल वेबर यांच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आहे. गेल्या वर्षा लातूरमधून मुलगी दत्तक घेतल्यानंतर सनी पुन्हा दोन मुलांची आई झाली. मात्र सनी सरोगसीद्वारे आई झाली, की तिने दोन मुलांना दत्तक घेतलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन सनीने आपला आनंद व्यक्त केला आहे. अॅशर सिंग वेबर आणि नोआ सिंग वेबर अशी चिमुरड्यांची नावं आहेत. सनी आणि डॅनिएल वेबरने गेल्या वर्षी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणमधून (कारा) निशा नावाच्या (त्यावेळी) 21 महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. सनीचा पती डॅनिएल वेबरनेही ट्विटरवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. 'नोआ आणि अॅशर यांना हेल्लो म्हणा. आयुष्याचा नवा अध्याय. करण, निशा, नोआ, अॅशर आणि मी'