'द शेप ऑफ वॉटर'ने सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शन या दोन मुख्य पुरस्कारांसह एकूण चार ऑस्कर मिळवले.
लॉस अँजेलस : हॉलिवूड विश्वातील अत्यंत मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर 'द शेप ऑफ वॉटर' चित्रपटाने मोहर उमटवली आहे. 'द शेप ऑफ वॉटर'ने सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शन या दोन मुख्य पुरस्कारांसह एकूण चार ऑस्कर मिळवले. फ्रान्सेस मॅकडोर्मंड यांना 'थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, तर 'द डार्केस्ट अवर' चित्रपटातील भूमिकेसाठी गॅरी ओल्डमन यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला. 'द शेप ऑफ वॉटर'साठी गिलर्मो डेल टोरो यांनी सर्वोत्तम दिग्दर्शनाची बाहुली पटकावली. लॉस अँजेलसमध्ये 90 वे ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी अभिनेता जिम्मी किमेल यांनी ऑस्करचं खुमासदार सूत्रसंचालन केलं. ‘टाईम्स अप’ म्हणत हॉलिवूड कलाकारांनी लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला. 'द शेप ऑफ वॉटर' चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे 13 विभागात नामांकनं मिळाली होती. त्यापैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर आणि सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन असे चार पुरस्कार या सिनेमाला मिळाले. 1962 सालच्या पार्श्वभूमीवर बाल्टिमोरमध्ये 'द शेप ऑफ वॉटर' चित्रपटाची कथा घडते. हाय सिक्युरिटी सरकारी लॅबमधील तरुणी मानवसदृश उभयचराच्या प्रेमात पडते, अशी या सिनेमाची कथा आहे. बहुचर्चित डंकर्क चित्रपटाने सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण आणि सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन असे तीन ऑस्कर पटकावले. चिली देशाच्या 'अ फँटॅस्टिक वुमन' या स्पॅनिश चित्रपटाने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा मान मिळवला. विशेष म्हणजे, अभिनेत्री श्रीदेवी आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना अकॅडमी अवॉर्ड्सतर्फे श्रद्धांजली देण्यात आली. दिवंगत कलाकारांच्या मोंटाजमध्ये श्रीदेवी आणि शशी कपूर यांचे फोटो दाखवून त्यांना मानवंदना देण्यात आली. अँड दि ऑस्कर गोज टू... सर्वोत्कृष्ट चित्रपट- द शेप ऑफ वॉटरसर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सेस मॅकडोर्मंड(थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)सर्वोत्कृष्ट अभिनेता - गॅरी ओल्डमन (द डार्केस्ट अवर)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक -गिलर्मो डेल टोरो(द शेप ऑफ वॉटर)सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग (मूळ गीत) - रिमेम्बर मी (कोको)सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर - द शेप ऑफ वॉटरसर्वोत्कृष्ट छायाचित्रण- ब्लेड रनर 2049सर्वोत्कृष्टमूळ पटकथा - गेट आऊटसर्वोत्कृष्टआधारित पटकथा - कॉल मी बाय युअर नेमसर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन (शॉर्ट) -द सायलेंट चाईल्डसर्वोत्कृष्ट लघु माहितीपट- हेवन इज अ ट्राफिक जॅम ऑन द 405सर्वोत्कृष्ट संकलन -डंकर्कसर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - ब्लेड रनर 2049सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर - कोकोसर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म- डिअर बास्केटबॉलसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अॅलिसन जॉने(आय, टॉन्या)सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - सॅम रॉकवेल- (थ्री बिलबोर्डस आऊटसाईड ईबिंग)सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट -अ फँटॅस्टिक वुमन(चिली)सर्वोत्कृष्टप्रॉडक्शन डिझाईन आणि सेट डेकोरेशन- द शेप ऑफ वॉटरसर्वोत्कृष्टध्वनिमिश्रण - डंकर्कसर्वोत्कृष्टध्वनिसंकलन- डंकर्कसर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर - इकरससर्वोत्कृष्ट वेशभूषा - फॅन्टम थ्रेडसर्वोत्कृष्ट रंगभूषा, केशभूषा - डार्केस्ट अवर सर्वोत्कृष्ट चित्रपट - द शेप ऑफ वॉटर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी) सर्वोत्कृष्ट अभिनेता - गॅरी ओल्डमन (द डार्केस्ट अवर) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अॅलिसन जॉने (आय, टॉन्या) ------- ऑस्करविषयी इंटरेस्टिंग काही...ऑस्करचं पहिलं रेडिओ ब्रॉडकास्ट - 1930 (दुसरा ऑस्कर सोहळा) (88 वर्षांपूर्वी) ऑस्करचं पहिलं टीव्ही प्रक्षेपण - 1953 (25 वा ऑस्कर सोहळा) (65 वर्षांपूर्वी) ऑस्करचं पहिलं रंगीत टीव्हीवरील प्रक्षेपण - 1966 (38 वा ऑस्कर सोहळा) (52 वर्षांपूर्वी) पहिल्या ऑस्करचा वेन्यू - (16 मे 1929) हॉलिवूड रुझवेल्ट हॉटेल 90 व्या ऑस्करचा वेन्यू - (4 मार्च 2018) डॉल्बी थिएटर, हॉलिवूड (हॉलिवूड रुझवेल्ट हॉटेलपासून अवघ्या काही अंतरावर) महत्त्वाच्या पुरस्कारांची नामांकनंसर्वोत्कृष्ट चित्रपट कॉल मी बाय युअर नेम डार्केस्ट अवर डंकर्क गेट आऊट लेडी बर्ड फँटम थ्रेड द पोस्ट द शेप ऑफ वॉटर थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन ख्रिस्तोफर नोलान (डंकर्क) जॉर्डन पीले (गेट आऊट) ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड) पॉल थॉमस अँडरसन (फँटम थ्रेड) गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर) फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी) मार्गो रॉबी (आय टोन्या) साईरसे रोणान (लेडी बर्ड) मेरिल स्ट्रीप (द पोस्ट) सर्वोत्कृष्ट अभिनेता टिमोथी चलामेट (कॉल मी बाय युअर नेम) डॅनिअल डे-लिवाईस (फँटम थ्रेड) गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट अवर) डॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे. इस्रायल, इएसक्यू) मेरील स्ट्रीप यांचा विक्रम दिग्गज अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांनी पुन्हा एकदा स्वतःचाच विक्रम मोडित काढला होता. मेरिल यांना 21 व्यांदा ऑस्कर नामांकन मिळालं. मात्र दुर्दैवाने त्यांना यंदाही पुरस्कार मिळवता आला नाही. 'द पोस्ट' चित्रपटातील कॅथरिन ग्राहम या व्यक्तिरेखेसाठी यावर्षी मेरील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नॉमिनेशन मिळालं होतं.