Arvind Shekar:  साऊथ मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती शनमुग प्रियावर (Shruthi Shanmuga Priya) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. श्रुतीचे पती अरविंद शेखरचे (Arvind Shekar)  निधन झाले आहे. अरविंदचा मृत्यू  हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला आहे, असं म्हटलं जात आहे. अरविंदने 2 ऑगस्ट रोजी वयाच्या 30 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मे 2022 मध्ये  अरविंद आणि श्रुती  यांचे लग्न झाले होते.


अरविंद शेखर हा फिटनेस कोच होता. अरविंदने  मिस्टर तामिळनाडू 2022 स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले होते. गेल्या वर्षी श्रुती आणि अरविंद  यांनी लग्न केले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी फर्स्ट वेडिंग अॅनिव्हर्सरी देखील सेलिब्रेट केली होती.


श्रुतीनं शेअर केली भावूक पोस्ट


श्रुतीनं अरविंद शेखरच्या निधनानंतर भावूक पोस्ट शेअर केली. श्रुतीनं अरविंदसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'हे फक्त शरीर दूर गेलं आहे. पण तुझा आत्मा आणि मन कायम रक्षण करेल! रेस्ट इन पीस माय लव्ह. माझे तुझ्यावरचे प्रेम आता अधिकाधिक वाढत आहे आणि आपल्यासोबतच्या  खूप आठवणी आहेत ज्या मी आयुष्यभर जपत राहीन. तुझी आठवण येते आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो, अरविंद! तू माझ्यासोबत आहेस, हे मला जाणवते.' श्रुतीनं शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट करुन नेटकऱ्यांनी अरविंदला श्रद्धांजली वाहिली आहे.






श्रुती  आणि अरविंद यांनी गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 






श्रुतीनं या मालिकांमध्ये केलं काम


श्रुतीनं छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केलं आहे. श्रुतीला नाथस्वरम या टीव्ही शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय तिने वाणी राणी, कल्याण परिसू आणि पोन्नूंजल या टीव्ही शोमध्ये काम केले आहे.तसेच श्रुतीनं काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.


संबंधित बातम्या


Angus Cloud : हॉलिवूड अभिनेता एंगस क्लाउडचं वयाच्या 25 व्या वर्षी निधन; वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने सोडले प्राण