Angus Cloud Passed Away : हॉलिवूड इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. हॉलिवूड अभिनेता आणि 'यूफोरिया' (Euphoria) फेम एंगस क्लाउडचं निधन (Angus Cloud) झालं आहे. वयाच्या 25 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने अभिनेत्याने प्राण सोडले आहेत. 


एंगस क्लाउडची 'यूफोरिया' ही सीरिज चांगलीच गाजली. आता अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया या ठिकाणी एंगस राहत असून राहत्या घरीच अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे त्याचे कुटुंबीय, चाहते आणि हॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. 


एंगस क्लाउडच्या कुटुंबियांना चाहत्यांना माहिती देत सांगितलं आहे की,"एंगस त्याच्या लाडक्या वडिलांना पुन्हा एकदा भेटला आहे. त्याचं त्याच्या वडिलांसोबत खूप घट्ट नातं होतं. एंगसला त्याच्या वडिलांच्या निधनाचा मोठा मानसिक धक्का बसला होता. पण आम्ही सर्व जण त्याच्यासोबत होतो. त्यामुळे त्याने स्वत:ला सावरायला हवं होतं". 


एंगसला पहिला ब्रेक कसा मिळाला? 


एंगसची 'यूरोफिया' ही वेबसीरिज चांगलीच गाजली. या सीरिजमधील त्याच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. या सीरिजमुळे तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. एंगस न्यूयॉर्कमझील Brooklyn या रस्त्यावर त्याच्या मित्रांसोबत फिरत होता. त्यामुळे 'यूरोफिया'च्या कास्टिंग दिग्दर्शकाची नजर एंगसवर पडली आणि त्यांनी त्याला विचारणा केली. 






एंगस क्लाउड नेहमीच 'यूरोफिया' या वेबसीरिजमुळे चर्चेत राहिला. तरुण कसे नशेच्या आहारी जातात हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आले होते. 'यूरोफिया' ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण काही कारणाने ही सीरिज वादाच्या भोवऱ्यातही अडकली होती. 'यूरोफिया' ही एंगसची पहिलीच सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 


एंगस क्लाउड कोण आहे? (Who is Angus Cloud)


एंगस क्लाउड हा हॉलिवूडचा एक लोकप्रिय अभिनेता आहे. 'यूफोरिया' या सीरिजमधील त्याने साकारलेलं 'फेज्को' हे पात्र चांगलच गाजलं. 'नॉर्थ हॉलिवूड' आणि 'द लाइन', रेखा, शीर्षकहीन यूनिवर्सल मॉन्स्टर्स या सिनेमातही तो झळकला आहे. तसेच उत्साह आणि उत्तम महिला या मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. एंगस सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात होता.


संबंधित बातम्या


Alan Arkin Passed Away : ऑस्कर विजेते अभिनेते अ‍ॅलन अर्किन यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास