Bollywood Actress :  प्रत्येक व्यक्तीची स्वतःची वेगळी कथा असते. जर कोणी आनंदी दिसत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याच्या मनात दुःख नाही. फिल्मी दुनियेच्या ग्लॅमरबद्दल बोललो तर इथेही प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते पण कधी कधी ते त्याबद्दल बोलतात. फार कमी वेळेस कलाकार आपल्या मनातील खदखद, दु:ख व्यक्त करतात, मनातील सल सांगतात. एका अभिनेत्रीनेही एका मुलाखतीत आपल्या मनातील वेदना सांगितल्या. लहानपणापासूनच या अभिनेत्रीला आपल्या हक्काच्या सुखापासून वंचित राहावे लागले.


बॉलिवूडमध्ये सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्री रेखा (Rekha) यांना आपल्या आयुष्यात अनेक दु:खांना सामोरे जावे लागले. वयाच्या सत्तरीत असणाऱ्या रेखा यांना  लहानपणापासूनच त्यांच्या आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागला आहे. ज्यांच्यावर त्यांनी प्रेम केलं ती व्यक्ती कधी त्यांना मिळाली नाही आणि ज्याच्या सोबत लग्नाची गाठ बांधली, त्यानेही लवकर साथ सोडून दिली. रेखा यांनी आपल्या मनातील दुखरी किनार सिमी ग्रेवालच्या मुलाखतीत सांगितली. 


10 ऑक्टोबर 1954 रोजी भानुरेखा गणेशन यांचा जन्म तामिळ कुटुंबात झाला. भानुरेखा यांना रेखा याच नावाने ओळखले जाते. रेखा यांचे वडील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते जेमिनी गणेशन होते.  त्यांनी ज्युनिअर आर्टिस्ट पुष्पवली सोबत प्रेम केले. या दोघांनी लग्न केले नाही पण त्यांना भानुरेखा ही मुलगी झाली. जेमिनी यांनी रेखाला अनेक वर्ष सार्वजनिकपणे वडिलांचे प्रेम दिले नाही. रेखाला आपल्या वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहावे लागले. 


मात्र, अनेक वर्षानंतर त्यांनी आपले नाव रेखाला दिले.  सिनेसृष्टीत आल्यानंतर रेखाचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले.  मात्र, रेखाच्या खऱ्या प्रेमाची चर्चा ही अमिताभ बच्चन सोबत राहिली. अमिताभ यांच्यापासून दूर गेल्यानंतर रेखाने 1990 मध्ये मुकेश अग्रवाल सोबत लग्न केले. पण, लग्नाच्या काही महिन्यानंतर मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली. त्यानंतर रेखा यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. 


अमिताभ बच्चन यांच्यासोबत नात्यावर भाष्य...



रेखाचे नाव नवीन निश्चल यांच्यासोबत पहिल्यांदा जोडले गेले. यानंतर जितेंद्रने किरण कुमार आणि नंतर विनोद मेहरा यांच्याशीही संबंध जोडले. विनोद मेहरासोबतच्या तिच्या लग्नाच्या अनेक बातम्या आल्या पण रेखाने नेहमीच सर्व गोष्टी फेटाळून लावल्या. 


80 च्या दशकात अमिताभ बच्चन तिच्या आयुष्यात आले. अमिताभ आणि रेखा पहिल्यांदा दो अंजाने चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. यानंतर दोघांनी जवळपास 10 चित्रपट एकत्र केले. त्यांचा शेवटचा एकत्र चित्रपट सिलसिला (1981) होता ज्यानंतर त्यांचे मार्ग कायमचे वेगळे झाले. 


सिमी ग्रेवालच्या शोमध्ये रेखाने काय म्हटले?


रेखाने अनेकदा आपल्याशी निगडीत विविध मुद्यांवर अतिशय स्पष्ट मते व्यक्त केली आहेत. सिमी ग्रेवालच्या शोमध्ये रेखाने अनेक गोष्टी मान्य केल्यात. टाइम्स नाऊ नुसार, सिमीने रेखा यांना त्यांच्या मद्य प्राशनच्या सवयीबाबत कोणी ऐकले आहे का असे विचारले? 






त्यावर रेखाने म्हटले की, मी मद्य प्राशन करते. अनेकदा प्रमाणाहून अधिक मद्य प्राशन करते. कधीकाळी ड्रग्जचेही सेवन केले आहे. मी अनेकदा नरकात असल्याप्रमाणे वागले. पण, मला कोणी विचारले का, मी असे का करते? मला आयुष्यात काय मिळाले आणि काय मिळाले नाही? 


सिमी ग्रेवालने पुढे विचारले की, एका विवाहित माणसावर तुमचा जीव जडला होता, त्याबाबत काय सांगाल?  त्यावर रेखा यांनी म्हटले की, मी त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केले होते. पण, मला कोणाचे घर तोडून खूश राहायचे नव्हते. त्यामुळेच मी कधीही आपला हक्क मागितला नाही. मी नेहमीच त्यांच्या आनंदासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करते असेही रेखा यांनी म्हटले.