मुंबई : बॉलिवूड गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील बिकीनीतला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं. मात्र राधिकानेही त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.


राधिकाने गेल्या आठवड्यात गोव्याच्या बीचवर रिलॅक्स करतानाचा एक फोटो पोस्ट केला होता. राधिका बिकीनी घालून एका मित्रासोबत वाईन घेताना या फोटोमध्ये दिसत आहे. अशा प्रकारचा बोल्ड फोटो टाकल्याबद्दल सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं.


'मला ट्रोल केलं जातंय, हे मला माहितही नव्हतं. हे हास्यास्पद आहे. बीचवर मी साडी नेसावी अशी लोकांची अपेक्षा आहे का?' असा सवाल राधिकाने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विचारला.

सोशल मीडियावर बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल झालेली राधिका ही पहिलीच अभिनेत्री नाही. यापूर्वी प्रियंका चोप्रा, तापसी पन्नी, एशा गुप्ता, दीपिका पदुकोण, परिणीती चोप्रा यासारख्या आघाडीच्या हिरोईन्सनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.