Nilu Kohli Husband Death:   मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री नीलू कोहलींचे (Nilu Kohli) पती हरमिंदर सिंह (Harminder Singh) यांचे निधन झाले. शुक्रवारी (24 मार्च) हरमिंदर सिंह हे गुरुद्वारमध्ये गेले होते.  गुरुद्वारा येथून घरी आल्यानंतर ते बाथरुममध्ये गेले.  बाथरुममध्ये असताना ते कोसळले. त्यावेळी नीलू यांच्या घरातील हेल्पर तिथे होता.  हरमिंदर सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 


नीलू कोहलीच्या मैत्रिणीनं दिली माहिती


एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार, नीलूची मैत्रीण वंदनानं हरमिंदर सिंह यांच्या निधनाची  (Nilu Kohli Husband Death) माहिती दिली. वंदनानं सांगितलं की, हरमिंदर सिंह यांच्या घरी एक हेल्पर होता. तो हेल्पर  हरमिंदर सिंह यांची लंचसाठी वाट बघत होता. हरमिंदर सिंह हे बराच वेळ बाहेर न आल्यानं हेल्परनं बेडरुममध्ये जाऊन चेक केलं. तिथे हरमिंदर सिंह नव्हते. त्यानंतर तो बाथरुममधमध्ये चेक करण्यासाठी गेला. त्यावेळी त्या हेल्परला  हरमिंदर सिंह हे बाथरुममध्ये पडलेले दिसले. वंदनानं सांगितलं की, हरमिंदर यांना मधुमेह होता. पण ते हेल्दी होते. हे सर्व अचानक झालं. मीडिया रिपोर्टनुसार, नीलूची मैत्रीण वंदनानं सांगितलं की,  हरमिंदर सिंह  यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार होणार आहेत,


नीलू कोहली ही अनेक वेळा सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करते. काही दिवसांपूर्वी नीलूनं हरमिंदर सिंह यांच्या सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केली होता. 






नीलू कोहलीनं हिट चित्रपटांमध्ये केलं काम


हरमिंदर सिंह यांची पत्नी अभिनेत्री नीलू हिनं हाउसफुल 2, पटियाला हाउस, हिंदी मीडियम यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2020 मध्ये रिलीज झालेल्या जोगी या चित्रपटातील नीलूच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. त्यांची 'यूनाइटेड कच्चे' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही वेब सीरिज 31 मार्च रोजी झी-5 या ओटीटी प्लेटफॉर्मवर (OTT Platform) रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेता सुनील ग्रोवरनं प्रमुख भूमिका साकारली आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या:


Entertainment News Live Updates 25 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!