Rajkummar Rao: प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) यानं आपल्या अभिनयानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. राजकुमारच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. नुकताच त्याचा भीड (Bheed Movie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. राजकुमार हा सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. 'प्लास्टिक सर्जरी केली आहे का?' असा प्रश्न विचारुन सध्या अनेक नेटकरी राजकुमार रावला ट्रोल करत आहेत. या ट्रोलर्सला राजकुमारनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
काय म्हणाला राजकुमार?
राजकुमारला सिद्धार्थ कनननं घेतलेल्या मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला. 'तू प्लास्टिक सर्जरी केली आहे का?' या प्रश्नाला उत्तर देत राजकुमार म्हणाला, नाही, 'मी प्लास्टिक सर्जरी केली नाही.' पुढे तो म्हणाला, 'अशा अफवा वाचून चेहऱ्यावर हसू येतं. लोक माझ्याबद्दल बोलत आहेत हे मला आवडते.' राजकुमारच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
राजकुमारचा भीड आला प्रेक्षकांच्या भेटीस
राजकुमार रावचा भीड हा चित्रपट 24 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात कोरोनाच्या काळात देशात झालेल्या लॉकडाऊनची कथा दाखवण्यात आली आहे. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. राजकुमार रावबरोबरच भीड या चित्रपटात दिया मिर्जा आणि भूमी पेडणेकर या अभिनेत्री देखील प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच अभिनेते पंकज कपूर यांनी देखील भीड चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
राजकुमारचे चित्रपट
राजकुमारने ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बधाई दो, हम दो हमारे दो, काय पो छे, न्यूटन, शादी में जरूर आना यांसारख्या हिट चित्रपटात राजकुमारनं काम केलं आहे. HIT: The First Case या तेलगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये देखील राजकुमार महत्वपूर्ण भूमिका साकारली. आता राजकुमारच्या भीड या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. राजकुमारच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
महत्वाच्या इतर बातम्या: