मुंबई : मॉडेल आणि अभिनेत्री लिसा रे आई बनली आहे. सरोगसीद्वारे तिने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. मुलींचा जन्म जॉर्जियामध्ये झाला आहे. सुफी आणि सोलिएल अशी दोन्ही मुलींची नावं आहेत.

खरंतर लिसाच्या मुलींचा जन्म जून महिन्यात झाला होता. मात्र आई बनल्याची आनंदाची बातमी तिने सप्टेंबर महिन्यात ट्विटरवर त्यांच्या फोटोसह शेअर केली.

अभिनेता श्रेयस तळपदे बाबा झाला

लिसाला 2009 मध्ये रक्ताचा कॅन्सर झाला होता. तिने कॅन्सरवर मात केली, पण तिला कायमच औषधं घ्यावी लागत असल्याने, तिच्यासाठी गर्भधारणा सोपं नव्हती. त्यामुळे तिने सरोगसीचा आधार घेतला.


लिसाने लिहिलं आहे की, 'माझं नशीब चांगलं आहे सध्याच्या नव्या तंत्रज्ञामुळे माझ्या आशा जागृत ठेवल्या आणि आई बनण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. यानंतर मी आणि माझ्या पतीने सरोगसीचा आधार घेण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेसाठी भारतच आमची पहिली पसंती होती आणि आम्ही यासाठी प्रसिदअध डॉक्टरचा सल्लाही घेतला होता. पण प्रक्रिया सुरु करण्याआधीच भारताने सरोगसीच्या नियमांमध्ये बदल केल्याने आम्हाला मोठा धक्का बसला.'

दोन मुली असताना सरोगसीने पुत्रप्राप्ती करणाऱ्या पित्यावर गुन्हा

भारतानंतर लिसाने सरोगसीच्या प्रक्रियेसाठी मेक्सिकोची निवड केली, पण तिथे निराशाच हाती आली. यानंतर लिसाच्या काही मित्रांनी तिला जॉर्जिया जाण्याचा सल्ला दिला. जॉर्जियामध्ये सरोगसीचा कायदा आहे आणि ही प्रक्रिया कायदेशीररित्या केली जाते. त्यामुळे लिसाने जॉर्जियाची निवड केली आणि काही महिन्यांसाठी तिथे स्थायिक झाली.

मृत मुलाच्या शुक्राणूतून सरोगसी, पुणेकर महिलेच्या घरी जुळी मुलं

मी आणि माझा पती चाळीशीनंतर आई-बाबा बनले आहोत, पण आमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. जेसनला वडिलांची भूमिका साकारताना मला पाहायचं आहे. जसं की तो मुलींना उचलून घेईल, त्यांचे डायपर्स बदलेल. सरोगसीबाबत असलेली मिथकं दूर करण्यासाठी तिने हा प्रवास शेअर केला.

करण जोहरला सरोगसीच्या माध्यमातून जुळी मुलं

याआधी शाहरुख खान, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, करण जोहर, सनी लिओनी हे बॉलिवूड कलाकारही सरोगसीद्वारे आई आणि बाबा बनले आहेत.