Kajol Angry Video : सध्या नवरात्रौत्सव सुरु आहे.  देवीची आराधना करण्यासाठी सामान्य भक्तांसह सेलिब्रिटी दुर्गा पंडालमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. दुर्गा पूजा करताना सेलिब्रिटींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान, अभिनेत्री काजोल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री काजोलचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती रागात असल्याचं दिसत आहे. हे व्हिडीओ सोशल मीडियावर खूपर व्हायरल होत आहेत.


दुर्गा पूजेमध्ये दिसलं अभिनेत्री काजोलचं रौद्र रुप


अभिनेत्री काजोल, जया बच्चन, राणी मुखर्जी या अभिनेत्री दुर्गा पूजा करतानाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान, एका व्हिडीओमध्ये काजोल दुर्गा पंडालमध्ये कुणावर तरी चिडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये काजोलचं रौद्र रुप पाहायला मिळत असल्याचं नेटकरी म्हणत आहे. दुर्गा पुजेच्या ठिकाणी चप्पल घालून येणाऱ्या आणि दुर्गा पुजेच्या स्थळी चुकीच्या प्रकारे वर्तन करणाऱ्यांवर काजोल ओरडताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.


भरकार्यक्रमात भडकली अभिनेत्री






नेमकं काय घडलं?


काजोलचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काजोल आणि जया बच्चन एकत्र दिसत आहेत. गुरुवारी सकाळी काजोल आणि जया पुन्हा एकदा नॉर्थ बॉम्बे सर्वजनीन दुर्गा पूजा पंडालमध्ये एकत्र दिसल्या. दुर्गा पूजा केल्यानंतर त्या एकमेकींना भेटल्या. यावेळी शिट्टी वाजवताना जोरदार आवाज कानावर पडत आहे. शिट्टीच्या आवाजाने काजोल चिडलेली दिसली. कोण शिट्टी वाजवत आहे असंही तिने विचारलं. 






 


काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या कुटुंबाकडून दरवर्षी उत्तर बॉम्बे सर्वोजनीन दुर्गा पूजा पंडाल आयोजित करण्यात येते. दरवर्षी येथे दुर्गा मातेचं धूमधडाक्यात स्वागत करण्यात येतं. दरवर्षीप्रमाणे ट्युलिप स्टार हॉटेलमध्ये पंडालचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, मालमत्तेची विक्री झाल्यामुळे यंदाचा दुर्गा पंडाल जुहू येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मैदानावर हलवला आहे.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Suraj Chavan : टीव्ही, फ्रिज, AC ते वॉशिंग मशीन, सूरज चव्हाणवर ह्युंदाईचा वर्षाव, घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू दिल्या!