मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री एमी जॅक्सनचा साखरपुडा झाला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉयफ्रेण्ड जॉर्ज पानायियोटो (George Panayiuotou) सोबत तिचा साखरपुडा झाला.
इन्स्टाग्राम अकाऊण्टवर फोटो शेअर करुन तिने ही आनंदाची बातमी दिली. एमी आणि जॉर्ज 2015 पासून रिलेशनशीपमध्ये आहेत.
एमीचा बॉयफ्रेण्ड जॉर्जचा परिवार हा ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक मानला जातो. लंडनमध्ये हिल्टन, पार्क प्लाझा आणि डबल ट्री यासारख्या आलिशान हॉटेलच्या चेन्स त्यांच्या मालकीच्या आहेत. जॉर्जचे वडील अँड्र्यू पानायियोटो हे प्रॉपर्टी डेव्हलपर असून त्यांची अंदाजे 3600 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
जॉर्ज हा अँड्र्यू यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. जॉर्जला एक सख्खा भाऊ आणी तीन सावत्र बहिणी आहेत. जॉर्ज 2014 मध्ये प्रसिद्ध मॉडेल डॅनिअल लॉएडला डेट करत होता. दोघा पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी जॉर्ज आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल आहे. यासाठी त्याला सहा महिन्यांची तुरुंगवारी झाली होती.
यापूर्वी, एमी जॅक्सन आणि अभिनेता प्रतीक बब्बर रिलेशनशीपमध्ये होते. मात्र अल्पावधीतच दोघांचं ब्रेकअप झालं. एमीने 'एक दिवाना था' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात प्रतीक तिचा सहकलाकार होता. त्यानंतर तिने सिंग इज ब्लिंग, फ्रिकी अली आणि अक्षय-रजनीकांतच्या 2.0 या हिंदी सिनेमात भूमिका केली.
अभिनेत्री एमी जॅक्सनचा साखरपुडा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jan 2019 11:51 PM (IST)
अभिनेत्री एमी जॅक्सन आणि ब्रिटीश उद्योजक जॉर्ज पानायियोटो 2015 पासून रिलेशनशीपमध्ये आहेत. इन्स्टाग्राम अकाऊण्टवर फोटो शेअर करुन एमीने साखरपुड्याची आनंदाची बातमी दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -