योगेश सोमण यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करुन चित्रपटाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
योगेश सोमण यांनी संजय दत्तचा थेट देशद्रोही, हरामखोर, व्यसनाधीन असा केला आहे. "संजू चित्रपटात एका देशद्रोह्याचं, एका अत्यंत व्यसनाधीन तरुणाचं आयुष्य ग्लोरिफाय केलं आहे. शिवाय दोन महिन्यांनी चित्रपटवाहिन्यांद्वारे 'संजू' नावाचं आक्रमण तुमच्या घरात घुसणार आहे," असं योगेश सोमण म्हणाले.
या आक्रमणाला उत्तर म्हणून संजय दत्तच्या देशद्रोही कारवायांबद्दल पोलिस केसपासून पोलिस मुलाखतींपर्यंत जे जे उपलब्ध आहे, ते आपल्या मुलांप्रमाणे चित्रपटांप्रमाणे दाखवावं. आपल्या मुलांना दोन्ही बाजू कळायला हव्या, असं योगेश सोमण यांनी सांगितलं.
उद्या जर तुमचा मुलगा नशा करुन घरामध्ये आला आणि आपल्याला बिलगला, तर आपण खासदार नाही, किंवा थोरली बहिणही खासदार नाही. सामान्य घरातील माणसं आहोत. घरातील किडूक मिडूक विकून आपलं पोरगं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पण त्याआधीच संजयसारख्या व्यक्तिमत्त्वाला ग्लोरिफाय होऊ द्यायचं नाही, असं आवाहन, सोमण यांनी पालकांना केलं आहे.
योगेश सोमण यांची फेसबुक पोस्ट
'संजू'ने इतिहास रचला, रविवारी 'बाहुबली 2' चाही विक्रम मोडला
काय म्हणाले योगेश सोमण?
दोन महिन्यांनी 'संजू' नावाचं आक्रमण तुमच्या घरात घुसणार आहे. तो चित्रपट कसा आहे, चित्रपटकर्त्यांनी कोणत्या भावनेने हा चित्रपट बनवला आहे. आम्ही फक्त रणबीर कपूरचा अभिनय बघायला जातोय, परेश रावलचा अभिनय पाहायला जातोय या सगळ्या गोष्टींची कारंजी फेसबुक आणि इतर समाज माध्यमांवर उडतच आहेत. परंतु एका देशद्रोह्याचं, एका अत्यंत व्यसनाधीन तरुणाचं आयुष्य ग्लोरीफाय केलं आहे, हे 100 टक्के आहे. हे आक्रमण आहे, तुमच्या आमच्या मुलांच्या मनावर.
या आक्रमणाला उपाय एकच आहे, संजय दत्त नावाच्या हरामखोर व्यक्तिमत्त्वाबद्दल ज्या ज्या गोष्टी माहित आहे, त्याच्या देशद्रोही कारवायांबद्दल पोलिस केसपासून पोलिस मुलाखातींपर्यत जे जे नेटवर उपलब्ध आहे, ते आपल्या मुलांना चित्रपटांप्रमाणे दाखवावं. आपल्या मुलांना दोन्ही बाजू कळायला हव्या.
या पोरामुळे बापाची उत्तराधार्थातील अख्खी करिअर स्टेकला लागली होती. हे पण कळायला हवं. सिनेमात ते दाखवलंय, पण कसं, मी अमूक केलंय, मी तमूक केलंय, टॅगलाईन काय तर मी देशद्रोही नाही...
उद्या जर तुमचा मुलगा नशा करुन घरामध्ये आला आणि सुनील दत्तला बिलगलाय त्याप्रमाणे आपलं पोरगं आपल्या पोटाला बिलगलं, तर आपण खासदार नाही, ना त्या पोराची थोरली बहिण खासदार आहे. आपण सामान्य माणसं आहोत. घरातलं किडूक मिडूक विकून आपल्याला आपलं पोरगं बाहेर काढण्यासाठी हरप्रयत्न करावे लागतील. त्याआधीच या व्यक्तिमत्त्वाला ग्लोरिफाय होऊ द्यायचं नाही.
जर हे आक्रमण थांबवायचं असेल तर सर्व पालकांना, थोरल्या भावंडांना, मित्रांना विनंती आहे की, तुम्ही उलटं आक्रमण सुरु करा. त्याच्याबद्दलच्या प्रत्येक फॅक्ट्स आपल्या पोरांना सांगितलं पाहिजे असं मला वाटतं.
"काही दिवसांनी सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणावर 'भाईजान' नावाचा सिनेमा येईल. कुठल्यातरी ईदचा मुहूर्त धरुन त्याचा शुभारंभ होणार. त्याची टॅगलाईन असेल, हां मैंने ऐश्वर्या से प्यार किया, हां मेरा ब्रेकअप हुआ था, हां उसके बाद मैं दारु पिने लगा और हां शायद रात को नशे में फुटपाथ पे सोए दो-चार लोगों को कुचला भी था, लेकिन मैं खुनी नहीं हूं. प्यार करनें वाला हूं, प्यार, प्रेम."