मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असून त्याने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तो त्याची सकाळ कोणा खास व्यक्तीसोबत एन्जॉय करत असल्याचं या फोटोवरुन दिसत आहे.

सुशांत सिंहने प्रसिद्ध फोटोग्राफर मुराद ओस्मान यांच्या #Followmeto (फॉलो मी टू) पोज रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात त्याने एका मुलीचा हात पकडलेला दिसत आहे. "माझ्या खासगी मुराद ओस्मानसोबत नाश्ता," असं कॅप्शन सुशांतने या फोटोला दिलं आहे. आता सुशांतची पर्सनल मुराद ओस्मान कोणं याचा विचार तुम्ही करा.


31 वर्षीय सुशांत नुकसाच 'राबता' या सिनेमानात कृती सेननविरुद्ध दिसला होता. तर लवकरच तो करण जोहरच्या ड्राईव्ह सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात जॅकलीन फर्नांडिस त्याच्या अपोझिट आहे.

याशिवाय 'चंदा मामा दूर के' या सिनेमात सुशांत सिंह राजपूत अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे. यात आर माधवन आणि नवाजुद्दिन सिद्दीकी यांची प्रमुख भूमिका असतील.