हैदराबाद : तलंगणामध्ये हैदराबादजवळील शम्साबादमध्ये झालेल्या अपघातात तेलुगू अभिनेता रवी तेजाचा भाऊ भरतचा मृत्यू झाला आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम महेश यांनी याबाबत माहिती दिली.
शम्साबाद येथील कोठवालगुडाजवळ एका ट्रकला भरत यांची कार भिडल्याने हा अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
भरत हे स्वतः कार चालवत होते आणि अपघातावेळी कारमध्ये एकटेच प्रवास करत होते. त्यांनी अनेक तेलुगू सिनेमांमध्ये अभिनय केलेला आहे. दारु पिऊन गाडी चालवली जात होती का, याचं उत्तर शवविच्छेदन अहवालानंतर समजणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.