मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडियावरुन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटरवर काही मिम्स शेअर केले आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, "मैने मांगा राशन, उसने दिया भाषण." या मिमच्या माध्यमातून प्रकाश राज यांनी मोदींच्या भाषणांवर टीका केली आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये भाजपचा सपशेल पराभव झाला असल्याने सर्वांनी भाजपवर टीका सुरु केली आहे. त्यामध्ये अभिनेते प्रकाश राजदेखील आघाडीवर आहेत. त्यांनी ट्विटरवर एका शेतकऱ्याचे चित्र असलेले मिम शेअर केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे. शेतकऱ्याने पंतप्रधानांकडे राशन माघितले, परंतु त्यांनी जनतेला केवळ भाषण दिले.


यासोबत प्रकाश राज यांनी अजूनही काही मिम्स शेअर केले आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की, मोदी खोटे बोलतात, मीडिया खोट्या बातम्या पसरवते, मोदींच्या पक्षाचे प्रवक्ते खोट्या गोष्टींवर स्पष्टीकरण देत बसतात, त्याच वेळी भाजपचे कार्यकर्ते मात्र या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात.