Nawazuddin Siddiqui luxurious bungalow : मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ते म्हणजे स्वत:चं हक्काच घर असाव. असचं स्वप्न घेऊन मुंबईत अभिनेता होण्यासाठी आलेल्या नवाझुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) सुरवातीच्या काळात सिनेमे मिळत नसताना पडेल ते काम केलं. पण आज एक यशस्वी अभिनेता झाल्यानंतर मुंबईत एक आलिशान घर (Nawazuddin Luxurious Home) बनवलं आहे. महालासारख्या वाटणाऱ्या या बंगल्याचे फोटो नवाझुद्दीनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.


काही दिवासांपूर्वीच मुंबईतील नवाझुद्दीनच्या घराचं काम पूर्ण झालं असून या त्याच्या बंगल्यापुढे एक सुंदर गार्डन देखील आहे. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये तो या गार्डनमध्ये एका खुर्चीवर बसून कोणतंतरी पुस्तक वाचताना दिसत आहे. दरम्यान नवाझुद्दीनने या घराचं काम करवून घेतना त्याच्या जुन्या घराच्या इंटीरियरची प्रेरणा घेऊन हे घरं तयार करवून घेतलं आहे. विशेष म्हणजे नवाझुद्दीनने या घराचं नाव त्याच्या वडिलांच्या आठवणीत 'नवाब' असं ठेवलं आहे. नवाझुद्दीन त्याच्या घराबाहेरील गार्डनमध्ये फोटोशूट करुन हे फोटो बऱ्याचदा शेअर करताना दिसत असतो. 



नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) कायमच त्याच्या अनोख्या अभिनयशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. त्यामुळे त्याचे फॅन्सही मोठ्या प्रमाणात असून नवाझुद्दीन सिद्दीकीचे फॅन्स त्याची वेब सिरीज सॅक्रेड गेम्सच्या (Sacred Games) तिसऱ्या पार्टची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच नवाझुद्दीन रात अकेली हे (Raat Akeli Hai) आणि सीरियस मॅन (Serious Men) या चित्रपटात झळकला होता.  


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha