Milind Soman On Pm Modi : बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमन (Milind Soman) नेहमीच त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. पण आता तो एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. मिलिंदने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली आहे. भेटीचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


मिलिंद सोमनने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत मिलिंदनं लिहिलं आहे,"यूनिटी रन नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याचा खूप आनंद होत आहे. पंतप्रधानांनादेखील माझ्यासारखं देशाचा इतिहास खेळ, आरोग्य आणि फिटनेसची आवड आहे. त्यांच्यासोबत संवाद साधताना मला याची जाणीव झाली".






मिलिंद सोमनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा मिलिंद सोमनचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 56 वर्षीय मिलिंद सोमन खूपच फिट आहे. तो दररोज योगा आणि व्यायाम करण्याला प्राधान्य देतो. मिलिंद सोमन खास त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. 


संबंधित बातम्या


Jamtara 2 : नेटफ्लिक्सच्या 'जामताडा 2'चा टीझर आऊट; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


OTT Release This Week : 'दिल्ली क्राइम 2' ते 'क्रिमिनल जस्टिस 3' 'या' आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार अॅक्शनचा तडका