Jamtara 2 : 'जामताडा' (Jamtara) ही नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेबसीरिज आहे. थरार नाट्य असणाऱ्या या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. 'जामताडा'च्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. 'जामताडा'चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे. 


'जामताडा 2'चा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2020 साली 'जामताडा' ही वेबसीरिज प्रचंड गाजली. 'जामताडा 2' या सीरिजचं नाव 'जामताडा सबका नंबर आयेगा फिरसे' असं आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना थरार-नाट्य अनुभवायला मिळणार आहे. ही सीरिज सत्य घटनांवर आधारित आहे. 'जामताडा 2' ही वेबसीरिज 23 सप्टेंबर 2022 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 






नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर 'जामताडा सबका नंबर आएगा सीझन 2'चा टीझर रिलीज केला आहे. टीझर शेअर करत नेटफ्लिक्सनं लिहिलं आहे," तुम्हाला ज्या नंबरवर कॉल करायचा आहे... तो व्यस्त आहे. कारण  'जामताडा 2' येत्या 23 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे". 


'जामताडा 2' या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सौमेंद्र पाधीने सांभाळली आहे. 'जामताडा 2' ही वेबसीरिज एका शालेय विद्यार्थ्यावर भाष्य करणारी आहे. या सीरिजच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. स्पर्श श्रीवास्तव, मोनिका पवार, आयुष्मान पुष्कर या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


वेबसफर | Jamtara Web Series Review : मिर्झापूर, वासेपूर, गंगाजलची शिळी खिचडी


OTT Release This Week : 'दिल्ली क्राइम 2' ते 'क्रिमिनल जस्टिस 3' 'या' आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार अॅक्शनचा तडका