शाहरुख खान, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, विद्या बालन, जॉन अब्राहम, एलियाना डिक्रुझ, सोनम कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, नंदिता दास यासारख्या डझनभर कलाकारांच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींचे फोटो अभय देओलने फेसबुकवर पोस्ट केले आहेत. प्रत्येक पोस्टमध्ये एखादी टिपण्णी लिहून अभय देओलने वर्णभेदाचा विरोध केला आहे.
गोऱ्या रंगाचं अवडंबर, फेअरनेस क्रीमची जाहिरात नाही करणार, अनुष्काचा कौतुकास्पद निर्णय
फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीआड काळा-गोरा असा वर्णभेद निर्माण केला जातो. ब्रँड अॅम्बेसेडर असणारे कलाकार जाहिरातीतून त्वचा उजळ करण्याचा पोकळ दावा करतात. यामुळे केवळ वर्णभेदाला खतपाणी मिळतं. म्हणून चित्रपट कलाकारांनी त्यात पडू नये, असा सल्ला त्याने दिला आहे.
विशेष म्हणजे वर्णभेदाचा मुद्दा उचलून फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या कलाकारांचं अभयने कौतुकही केलं आहे. माझ्या चित्रपटसृष्टीतले सगळेच कलाकार बेजबाबदार नाहीत, असं सांगत त्याने 'हिंदुस्थान टाइम्स' या वृत्तपत्रातील एका रिपोर्टची लिंकही शेअर केली आहे.
म्हणून कंगनाने दोन वर्षांपूर्वी नाकारली होती 2 कोटींची जाहिरात!
वर्णभेदाचा ठाम विरोध करणारी अभिनेत्री नंदिता दास, बंडखोर अभिनेत्री कंगना रनौत, हरहुन्नरी अभिनेता रणदीप हुडा, चॉकलेट हिरो रणबीर कपूर, अभिनेत्री स्वरा भास्कर यांचं अभयने कौतुक केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर अभय देओलच्या या पोस्टची चर्चा रंगली आहे. वर्णभेदाविरोधात आवाज उठवल्याप्रकरणी अभयचं अनेक यूझर्सनी कौतुक केलं आहे.
अभय देओलच्या फेसबुक पोस्ट्स :