मुंबई : आराध्या मोठेपणी अभिनेत्री बनणार का? चाहत्याच्या या प्रश्नावर अभिनेता अभिषेक बच्चनने शानदार उत्तर दिलं. आराध्या जे करिअर निवडेल, त्याने मला आनंदच होईल, असं अभिषेक म्हणाला.
अभिषेक बच्चन ट्विटवर एका व्हिडीओ चॅटमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. "आराध्या बच्चन कुटुंबाच्या पावलावर पाऊल टाकून बॉलिवूडमध्ये करिअर करणार का?", असा प्रश्न एका चाहत्याने अभिषेकला विचारला. त्यावर अभिषेक म्हणाला की, "माझ्या मुलीला जे आवडेल ती तेच करेल. यातच मला आनंद आहे. मी लहान असताना मला जे आवडायचं तेच करण्याची मुभा होती. त्यामुळे आराध्यासाठीही माझी हिच इच्छा आहे की, तिला आवडेल तेच तिने करावं."
https://twitter.com/juniorbachchan/status/801727909132177408
"मी आराध्या आणि ऐश्वर्या यांच्यावर सारखंच प्रेम करतो. मी पत्नी किंवा मुलीमध्ये कोणा एकाची निवड करु शकत नाही. त्यामुळे माझं दोघींवर समान प्रेम आहे," असंही अभिषेकने सांगितलं.
https://twitter.com/juniorbachchan/status/801725368730124288
याशिवाय सैफ अली खानसोबत सिनेमा करण्याची इच्छा असल्याचंही अभिषेक बच्चन यावेळी म्हणाला.
https://twitter.com/juniorbachchan/status/801727342087442432