मुंबई : नाना पाटेकरची भूमिका असलेल्या 'अब तक 56' या चित्रपटाच्या पटकथा लेखकाने आत्महत्या केली. 32 वर्षीय रविशंकर आलोक यांनी मुंबईत राहत्या इमारतीवरुन उडी मारली.
रविशंकर मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात सात बंगला परिसरात असलेल्या वसंत सोसायटीत राहत होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांनी सात मजली इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारली. या प्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविशंकर भावासह भाड्याच्या घरात राहत होते. भावाने घगमगडलेला प्रकार इमारतीच्या वॉचमनने सांगितला. रविशंकर गेले अनेक दिवस तणावाखाली होते. त्यांच्यावर डॉ. पाटकर उपचार करत असल्याची माहिती त्यांच्या भावाने दिली.
रविशंकर यांनी तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला.
अभिनेते नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला 'अब तक 56' हा चित्रपट पोलिस अधिकारी दया नायक यांच्या आयुष्यावर आधारित होता. 2004 मध्ये हा चित्रपट रीलीज झाला होता. रवीशंकर त्यावेळी अवघे 18 वर्षांचे होते.