मुंबई : भोजपुरी सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे आणि अभिनेता पवन सिन्हा यांच्या सुपरहिट ‘सत्या’ सिनेमातील ‘रात दिया बुताके’ या गाण्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. या गाण्याने व्ह्यूजमध्ये यूट्यूबवर विक्रमाची नोंद केली आहे.


‘रात दिया बुताके’ गाण्याने यूट्यूबवर आतापर्यंत 21 कोटी 60 लाख व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. आम्रपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही यासंदर्भात एक फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

20 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करणारं हे गाणं भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील एकमेव ठरलं आहे. आतापर्यंत कुठल्याच भोजपुरी गाण्याने यूट्यूबवर एवढ्या व्ह्यूजचा टप्पा पार केला नव्हता.

‘रात दिया बुताके’ गाणं वेव्ह म्युझिकने यूट्यूबवर दोनवेळा शेअर केले आहे. पहिल्यांदा शेअर केलं होतं, त्यावेळी 11 कोटी 60 लाख व्ह्यूज, तर शेअर केलेल्या गाण्याला 10 कोटी व्ह्यूज आहेत. त्यामुळे एकूण 21 कोटी 60 लाख व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

आम्रपाली दुबे भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री असून, तिची क्रेझ प्रचंड आहे. तिची बहुतेक गाणी यूट्यूबवर सुपरहिट ठरतात. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन तिला केवळ चार वर्षेच झाली आहेत. मात्र तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.

पाहा गाण्याचा व्हिडीओ :