यावर आमीर खानने लिहिलं आहे की, मी जायराची पोस्ट वाचली. तिला अशी पोस्ट लिहावी लागली, हे मी समजू शकतो. जायरा, आम्ही तुझ्या पाठिशी आहोत. तुझ्यासारखी हुशार, तरुण, प्रतिभावान, मेहनती, आदर, काळजी करणारी आणि धाडसी मुलगी फक्त देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी रोल मॉडेल आहे. माझ्यासाठी तर तू नक्कीच रोल मॉडेल आहेस. लव्ह. आमीर
एवढंच नाही तर आमीरने सगळ्यांना तिच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं आहे. आमीर लिहितो की, माझं सगळ्यांना आवाहन आहे की, आता तिला एकटं सोडा, ती फक्त 16 वर्षांची लहान मुलगी आहे, हे सत्य स्वीकारा आणि त्याचा आदर ठेवा. ती तिच्या आयुष्याला उत्तमरित्या सामोरं जात आहे.
'दंगल' फेम जायरा वसीम वादात, सोशल मीडियावरुन माफीनामा
काय आहे प्रकरण?जायरा वासिमची फेसबुक पोस्ट
"मी नुकतीच ज्यांना भेटले, त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर मी ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यांची जाहीर माफी मागते. मात्र, अनेकवेळा परिस्थितीच्या मागे कुणाचेच काही चालत नाही, हे समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त करते. मी 16 वर्षांची आहे, हे समजून माझ्यासोबत तसाच व्यवहार करावा. मी जे काही केलं, त्याबाबत मी सर्वांची माफी मागते. कारण माझ्याकडून अनावधानाने चूक घडली. मला सर्वजण माफ करतील अशी अपेक्षा व्यक्त करते. काश्मीरी जनतेने तिला रोल मॉडेल समजू नये, अशी अपेक्षाही मी व्यक्त करते. कारण इतिहासात अनेक रोल मॉडेल आहेत, त्यामुळे मला त्यांच्या पंगतीत नेऊन बसवणे हा त्यांचा अपमान ठरेल. मला कोणताही वाद उपस्थित करायचा नाही. मी जे काही करत आहे, त्यावर मला अभिमान नाही."