Aamir Khan And Rajkumar Hirani Next Film : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यामुळे आमिरने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. पण आता तो पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीत कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
आमिरने गेल्या काही दिवसांपूर्वी मनोरंजनसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तो पुन्हा एकदा कमबॅक करणार असल्याने चाहते आनंदी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी आमिरच्या 'थ्री इडियट्स' (3 Idiots) या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा आमिरला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आमिरने कमबॅकबद्दल भाष्य केलं होतं. तो म्हणालेला,"अजून मानसिक तयारी झालेली नाही".
राजकुमार हिरानींसोबत आमिर खान काम करणार
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा असणारा अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) मनोरंजनसृष्टीपासून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे चाहते त्याच्या कमबॅकची प्रतीक्षा करत आहेत. 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमानंतर आमिरने कोणताही सिनेमा केलेला नाही. पण आता आमिरचं नाव एका बायोपिकसोबत जोडलं जात आहे.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, आमिर खान (Aamir Khan) आणि राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांचा आगामी सिनेमा बायोपिक असणार आहे. राजकुमार हिरानींसोबत काम करण्यासाठी आमिरने होकार दिल्याचं म्हटलं जात आहे. आमिर खान पुढल्या वर्षी 2024 मध्ये बायोपिकच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. राजकुमार हिरानी सध्या शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.
आमिर अन् राजकुमार हिरानी यांनी 'या' सिनेमांत केलंय काम
आमिर खान आणि राजकुमार हिरानीची जोडी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेली आहे. आमिर आणि राजकुमार हिरानी यांनी 2009 साली '3 इडियट्स' या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी 'पीके' हा सिनेमा केला. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरले. आता राजकुमार हिरानी आणि आमिरच्या आगामी सिनेमाबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. आमिर-राजकुमारचा आगामी बायोपिक कोणता आहे? या सिनेमात कोणते कलाकार झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या