Dia Mirza Birthday: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं (Dia Mirza) तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. आज दियाचा 41 वा  वाढदिवस आहे.  दियाचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी हैदराबादमध्ये झाला. दियाच्या आई दीपा या बंगाली हिंदू आहेत. तर तिचे वडील फ्रँक हेड्रिच जर्मन आहेत. ती चार वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दियाच्या आईने हैदराबादचे अहमद मिर्झा यांच्यासोबत लग्न केले. 


दियाने तिचे शिक्षण हैदराबादमध्ये केले आहे. कॉलेजमध्ये असताना तिनं काम करायला सुरुवात केली. ती एका मीडिया फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह होती. यादरम्यान तिनं लिप्टन, वॉल्स आईस्क्रीम, इमामी आणि इतर कंपन्यांसह सर्व मोठ्या कंपन्यांकडून मॉडेलिंगची ऑफर मिळू लागली. 


दिया मिर्झाने 2000 साली फेमिना मिस इंडिया  या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत ती सेकंड रनर अप ठरली. मिस इंडिया स्पर्धेत तिने मिस ब्युटीफुल स्माइल, मिस एव्हॉन आणि मिस क्लोज-अप स्माइल ही बक्षीसं जिंकली. 2000 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी दियाने मिस आशिया पॅसिफिकचा किताब पटकावला.  


बॉलिवूडमधील हिट चित्रपटांमध्ये केलं काम
दियाने 19 ऑक्टोबर 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आर माधवन यानं प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटातील दियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.नंतर 'दीवानापन', 'तुमको ना भूल पायेंगे', 'दम', 'परिणीता', 'लगे रहो मुन्नाभाई' आणि 'संजू' या हिट चित्रपटांमध्ये दियानं काम केलं. 



दियाने बराच काळ 18 ऑक्टोबर 2014 रोजी साहिल संगासोबत दिल्लीत लग्नगाठ बांधली. पण  2019 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दियानं 2021 मध्ये वैभव रेखी सोबत लग्नगाठ बांधली. दिया आणि वैभवला एक मुलगा आहे. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


आर. माधवन अन् दिया मिर्झाची केमिस्ट्री असलेल्या 'Rehna Hai Tere Dil Mein' ची 20 वर्ष; चित्रपटाचे हटके किस्से