Aamir Khan Meet Suhani Parents :  आमिर खानचा (Aamir Khan) चित्रपट 'दंगल'मध्ये (Dangal) बबिताची लहानपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर ( Suhani Bhatnagars) हीचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. सुहानीने अवघ्या 19 वर्षीच जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना धक्का बसला. दंगल चित्रपटाच्या टीमने सुहानीच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. अभिनेता आमिर खान यानेही सुहानीच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. सोशल मीडियावर आमिर खान आणि सुहानीच्या कुटुंबीयांचा फोटो समोर आला आहे. 


व्हायरल झाला फोटो 


आमिर खानचा सुहानीच्या आई-वडिलांसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सर्वजण सुहानीच्या फोटोसोबत उभे आहेत. आमिरने एका हाताने सुहानीचा फोटो पकडला आहे.






सुहानी या आजाराशी देत होती झुंज 


सुहानी डर्माटोमायोसिटिस नावाच्या आजाराने ग्रस्त होती. या आजारामुळे तिच्या संपूर्ण अंगावर सूज आली होती. हा संसर्ग इतका वाढला होता की तिच्या फुफ्फुसात पाणी भरले होते. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.


आमिर सुहानीच्या संपर्कात होता


सुहानीच्या आईने एका मुलाखतीत सांगितले होते की, आमिर खान तिच्या संपर्कात होता पण तिने सुहानीच्या आजाराबद्दल अभिनेत्याला सांगितले नव्हते. आम्ही त्याला कोणताही मेसेज केला तर तो लगेच त्याला रिप्लाय द्यायचा आणि कॉलही करायचा.


आमिर खानचा दंगल चित्रपट चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिरसोबत फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, जायरा वसीम, साक्षी तन्वर आणि अपारशक्ती खुराना महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले होते.


सुहानीच्या अभिनयाचा प्रवास


सुहानी भटनागरने 2016 मध्ये आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुहानीला गाण्याची आणि नृत्याची खूप आवड होती.  पूजा भटनागर असं तिच्या आईचं नाव. बॉलीवूडमधील पदार्पणापूर्वी तिने अनेक जाहिरातींसाठी काम केलं आहे.  'दंगल' चित्रपटातील तिचं काम प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडली आणि ती प्रकाशझोतात आली. अगदी तरुण वयातच सुहानीने जगाचा निरोप घेतला असल्याने हळहळ व्यक्त केली जातेय. 


 इतर महत्त्वाच्या बातम्या :